
चप्पल VS दगड! आजोबा आणि नातवामध्ये सुरु झालं अनोखं महाभारत, अखेर विजय झाला कुणाचा? पहा Viral Video
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या गोंडस लढाईत एक आजोबा भिंतींच्या मागून हातात चप्पल घेऊन नातवाच्या दिशेने पाहत असल्याचे दिसते. तर नातू देखील रस्त्याला हातात दगड घेऊन त्याच्यांकडे एकटक नजरेने पाहत असतो. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव असे आहेत की जणू काही मोठी लढाई सुरू झाली आहे. आजोबा कधी पुढे जातात तर कधी मागे हटतात, तर नातू धैर्याने प्रतिसाद देताना दिसतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, काही क्षणातच नातू आपल्या हातातील दगड जमिनीवर फेकताना दिसतो ज्यानंतर आजोबा काही बोलतात आणि मग काहीवेळाच्या बाचाबाचीनंतर त्याच्यांतील भांडणाला पूर्णविराम मिळते. यूजर्स आता व्हिडिओतील दृश्ये पाहून भारीच खुश झाले असून काही लोक हे खरे प्रेम आहे असं म्हणत आहेत तर काही जण म्हणत आहेत की आजोबा-नातूची सर्वात सुंदर जोडी आहे.
जिदंगी के पहला दोस्त और आखिरी दोस्त के बीच युद्ध 😂 pic.twitter.com/3bTMtsrkuV — छपरा जिला 🇮🇳 (@ChapraZila) January 22, 2026
अंटार्क्टिकाच्या Nihilist Penguin ची जगभरात का सुरु आहे चर्चा? दिल्ली पोलिसांनीही शेअर केले खास Meme
दरम्यान हा व्हिडिओ @ChapraZila नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “चापटाची भिती नाही वाटातं चप्पलेची भिती वाटते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे असे युद्ध आहे जे मी आता इच्छा असूनही लढू शकत नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे युद्ध नाही एक महासंग्राम आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.