(फोटो सौजन्य: Instagram)
काय दिसलं व्हिडिओत?
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एक तरुण “जगातील सर्वात लहान सिंह” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंहाला पाळत असल्याचे दिसले. हा सिंह इतका लहान आहे की तो त्याला हातात उचलूही घेता येत होते. व्हिडिओमध्ये, तो तरुण म्हणतो की हा जगातील सर्वात लहान सिंह आहे, ज्याचे नाव सिम्बा आहे. तो म्हणतो की कधीकधी त्याला भीती वाटते की तो त्याला चावेल. दरम्यान व्हिडिओतील ही दृश्ये खरी आहेत की खोटी याची पुष्टी अद्याप झालेली नाही. युजर्सना व्हिडिओतील चिमुकला सिंह भरपूर आवडला असला तरी काहींनी दावा केला आहे की, हा सिंह खरा नसून एआयच्या मदतीने त्याला तयार करण्यात आले आहे.
दरम्यान हा व्हिडिओ @taruvzn नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मला खरोखरच वाटतंय की हे एआय नसावं कारण मला घरी एक हवंय ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जर छोटे सिंह अस्तित्वात असतील तर मी त्यांना दत्तक घेईन. किती गोंडस आहे हा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मला नाही माहित त्याने याला कसं बनवलं पण हा छोटा सिंह फार छान दिसत आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






