अंटार्क्टिकाच्या Nihilist Penguin ची जगभरात का सुरु आहे चर्चा? दिल्ली पोलिसांनीही शेअर केले खास Meme (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, या पेंग्विनचा मूळचा व्हिडिओ हा २००७ मधील आहे. चित्रपट निर्माते वर्नर हझोर्ग यांच्या Encounters at the End Of the World या डॉक्टुमेंटरीतील आहे. यामध्ये हजारो पेंग्विनस अन्नाच्या शोधात समुद्राच्या दिशेने निघालेले असतात. मात्र यातील एक पेंग्विन अचानक आपला मार्ग बदलून ओसाड पडलेल्या बर्फाळ डोंगराच्या दिशेने चालायला लागतो. ही डॉक्युमेंटरी बनवताना हझोर्ग यांना पेंग्विन भरकटला असे वाटले होते. परंतु शास्त्रज्ञांच्या मते ही एक प्रकारची डेथ थेअर आहे. म्हणजे त्या ओसाड डोंगराळ भागात अन्न-पाणी नाही. यामुळे त्याला किती परत आणतले तर तो पुन्हा त्याचे दिशेने एकटा चालू लागलणार आहे. तसेच शास्त्रज्ञ असेही सांगतात की ही एक न्यूरॉलॉजिकल कंडिशन आहे, ज्यामुळे पेंग्विन दिशाभूल झाल्यामुळे असा वागत असवा.
२०२६ मध्ये का होत आहे ट्रेंड?
सध्या २०२६ मध्ये या पेंग्विनचा व्हिडिओ सर्व सोशळ मीडिया प्लॅटफॉर्म्सवर जोरदार व्हायरल होत आहेत. यावर हजारो मीम्स तयार केले जात आहे. आजच्या तरुणांना तो पेंग्विन त्यांच्यासारखा वाटत आहे. यामागचे कारण म्हणजे, सध्याच्या धावपळीच्या जग, कामाचा ताण, समाजाच्या अपेक्षा आणि गर्दी हिस्सा न बनण्याची आवड लोकांना या पेंग्विनशी जोडत आहे. सध्याच्या तरुणालाईला देखील हा सगळा ताण विसरुन या पेंग्विनसारखे कुठे तरी दूर शांततेच्या ठिकाणी जाण्याची इच्छा होत आहे.
यामुळे या व्हिडिओवर अनेक मीम्स तयार होत आहे. व्हिडिओवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहे. कोणी म्हणतेय तो पेंग्विन मी आहे, तर कोणी म्हणतेय त्याने संपूर्ण व्यवस्थेला नकार दिला आहे, तर कोणी मी माझ्या मर्जीचा मालक आहे, तर कोणी दुसऱ्यांच्या अटींवर जगण्यापेक्षा स्वत:च्या अटींवर जगावं असे म्हणत आहे.
याच वेळी दिल्ली पोलिसांनी देखील या पेंग्विनवर एक मीम तयार करत महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. यामध्ये दिल्ली पोलिसांनी आयुष्य हे विचारत नाही तुम्ही किती दूर गेला, तर तुम्ही सुरक्षित आहात का हे विचारते, यामुळे तुम्ही ७० किलोमीटर जा नाहीतर, ७० मीटर जा. पण सजुतदारपणा हा हेल्मेट वापरण्यातच आहे. सध्या हे मीम सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






