Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शौक बडी चीज है! बायकोला बिकिनी घालता यावी म्हणून नवऱ्याने संपूर्ण बेटच खरेदी केलं, किंमत ऐकून आवाक् व्हाल

"शौक बडी चीज है" हिंदी चित्रपटातील हा डायलॉग तुम्ही अनेकदा ऐकला असेल मात्र खऱ्या आयुष्यातील याचे उत्तम उदाहरण तुम्हाला आजच्या या व्हायरल व्हिडिओतून पाहायला मिळणार आहे. दुबईच्या एका शेखने आपल्या बेगमला बिकिनी घालता यावी म्हणून थेट संपूर्ण बेटचं विकत घेतले आहे. या बेटाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 27, 2024 | 11:29 AM
शौक बडी चीज है! बायकोला बिकिनी घालता यावी म्हणून नवऱ्याने संपूर्ण बेटच खरेदी केलं, किंमत ऐकून आवाक् व्हाल

शौक बडी चीज है! बायकोला बिकिनी घालता यावी म्हणून नवऱ्याने संपूर्ण बेटच खरेदी केलं, किंमत ऐकून आवाक् व्हाल

Follow Us
Close
Follow Us:

शौक बडी चीज है हा फेमस डायलॉग तुम्ही हिंदी चित्रपटामध्ये अनेकदा ऐकलं असेल. या डायलॉगला साजेशी अशी बातमी समोर आली आहे. UAE म्हणजेच संयुक्त अरब एमिरेट्स हा जगातील वेगाने वाढणारा दुसरा दुसरा विकसित देश आहे. येथील लोकांची जीवनशैली. येथील इमारती, रस्ते, पोलिस आणि लोकांची खर्च करण्याची शैली जगभर प्रसिद्ध आहे. UAE मधील सर्वात प्रसिद्ध शहर दुबई आहे. अनेक अब्जाधीश शेख दुबईत राहतात. ज्यांच्याकडे अफाट संपत्ती आहे. ही संपत्ती दाखवण्यासाठी दुबईतील शेख काही मागे हटत नाहीत.

सध्या एक विचित्र घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अलीकडेच एका अब्जाधीश शेखने आपल्या पत्नीसाठी करोडोंचे बेट विकत घेतले आहे. पण या मागचे कारण तुम्हाला आश्चर्यचकित करेल. हे प्रकरण आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

हेदेखील वाचा – दूध समजून विदेशी तरुणाने प्यायली भांग, म्हणाला भारतात कधीही… हॉस्पिटलमधील धक्कादायक Video Viral

काय आहे प्रकरण?

दुबईतील एका गृहिणीला बिकिनी घालून मोकळेपणाने फिरता यावे म्हणून तिच्या नवऱ्याचे थेट संपूर्ण बेटच विकत घेतले आहे. सौदी अल नादक (वय 26) या महिलेने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर ही बातमी शेअर केली आहे. तसेच पर्सनल बेटाचा व्हिडीओदेखील तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला 25 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे.

हेदेखील वाचा – मरणाच्या दारी पोहचवणाऱ्या सुसाइड मशीनने झाला पहिला मृत्यू, जंगलात दिसले भयानक दृश्य

मुळची युकेमधील असलेल्या सौदी अल नादकने दुबईतील उद्योगपती जमाल अल नादकबरोबर लग्न केलं. दुबईत एकत्र शिक्षण घेत असताना दोघांची ओळख झाली आणि मग त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. सौदी अल नादक ही इन्स्टाग्रामवर चांगलीच सक्रिय आहे. सोशल मीडियावर ती नेहमीच आपल्या जीवनशैलीचे फोटोज आणि व्हिडिओज शेअर करत असते. त्यातीलच एक व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. हे बेट आशिया खंडात असून त्याची किंमत 50 दशलक्ष डॉलर असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय रुपयांमध्ये ही किंमत 418 कोटींहून अधिक होते.

सौदीने मागील आठवड्यात नवऱ्याने तिच्यासाठी घेतलेल्या बेटाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. आम्ही गुंतवणूक म्हणून हे बेट घेतलं आहे. जेणेकरून मला बिकिनी परिधान करून बिनधास्त फिरता येईल. मी सुरक्षित राहावी, अशी माझ्या पतीला चिंता होती. म्हणून त्यानं थेट बेटच विकत घेतले,. असे सौदीने व्हिडिओत म्हटले आहे. तिच्या या व्हिडिओवर अनेकांना कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी चांगल्या तर काहींनी काहींनी आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याची गरज नाही अशी टीका केली आहे.

Web Title: Husband buys private island so that wife can wear a bikini dubai woman claims

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2024 | 11:29 AM

Topics:  

  • Dubai
  • viral video

संबंधित बातम्या

Men Doing Garba in Saree: २०० वर्षांपूर्वीच्या शापाची अनोखी परंपरा! पुरुषांनी साडी नेसून केला गरबा; अहमदाबादचा अनोखा Video Viral
1

Men Doing Garba in Saree: २०० वर्षांपूर्वीच्या शापाची अनोखी परंपरा! पुरुषांनी साडी नेसून केला गरबा; अहमदाबादचा अनोखा Video Viral

बाबा रे बाबा! लंडनच्या रस्त्यावर अनिरुद्धाचार्य महाराजांचा Range Rover ने प्रवास, कार कलेक्शन तर एकदा वाचाच
2

बाबा रे बाबा! लंडनच्या रस्त्यावर अनिरुद्धाचार्य महाराजांचा Range Rover ने प्रवास, कार कलेक्शन तर एकदा वाचाच

बॉम्ब से डर नहीं लगता, हा तर यमराजाचा मेव्हणाच जणू! हातावर अन् डोक्यावर फोडला सुतळी बॉम्ब; मग जे घडलं… Video Viral
3

बॉम्ब से डर नहीं लगता, हा तर यमराजाचा मेव्हणाच जणू! हातावर अन् डोक्यावर फोडला सुतळी बॉम्ब; मग जे घडलं… Video Viral

अस्थी विसर्जन करायला गेले अन् रस्त्यातच यमाने गाठलं, कार अपघातात कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू; घटनेचा थरारक Video Viral
4

अस्थी विसर्जन करायला गेले अन् रस्त्यातच यमाने गाठलं, कार अपघातात कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू; घटनेचा थरारक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.