Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय टपाल विभागाचा मोठा उपक्रम! टपाल अन् पार्सल आता सायकलवरून नाही, थेट आकाशाच्या मार्गाने पोहचणार घरी; Video Viral

India Post Launched Drone Mail : भारतीय टपाल सेवा आता डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक वेगवान होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. दुर्गम आणि डोंगराळ भागात टपाल पोहोचवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. याचा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे ज्यात ड्रोन टपाल डिलिव्हरी करताना दिसला.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 02, 2026 | 02:49 PM
भारतीय टपाल विभागाचा मोठा उपक्रम! टपाल अन् पार्सल आता सायकलवरून नाही, थेट आकाशाच्या मार्गाने पोहचणार घरी; Video Viral

भारतीय टपाल विभागाचा मोठा उपक्रम! टपाल अन् पार्सल आता सायकलवरून नाही, थेट आकाशाच्या मार्गाने पोहचणार घरी; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • ज्या ठिकाणी पोहोचणे आव्हानात्मक आहे, तिथे नवी पद्धत वापरण्याची तयारी.
  • पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत सेवा अधिक वेगाने पोहोचवण्याचा प्रयत्न.
  • या तंत्रज्ञानाचा वापर आणखी काही दुर्गम भागांमध्ये करण्याचे नियोजन.
डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करुन भारतीय टपाल सेवेचे नूतनीकरण करण्यात आले आहे. आसामा आणि हिमाचल प्रदेशासारख्या डोंगराळ परिसरात आता टपाल, पार्सल किंवा पत्राची डिलिव्हरी सायकलवरुन नाही तर चक्क ड्रोनच्या मदतीने केली जाणार आहे. याच्या मदतीने डोंगराळ भागात टपास सेवा पोहचवणे सोपे जाईल. ज्या भागांमध्ये पूर्वी रस्त्याने पोहोचणे अवघड आणि वेळखाऊ होते, तिथे सेवा पोहोचवण्यास आता ड्रोनच्या मदतीने अधिक गती मिळेणार आहे.याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे जो सध्या चांगलाच ट्रेंडमध्ये आहे. व्हिडिओमध्ये ड्रोन घराबाहेर टपालाची डिलिव्हरी करताना दिसला. चला व्हिडिओत काय दिसले ते जाणून घेऊया.

हा आहे पाकिस्तानचा फेक डाॅमिनोज, इथे मेन्यूपासून सर्वकाही आहे बनावटी! परदेशी पर्यटकाने केला पर्दाफाश; Video Viral 

काय दिसलं व्हिडिओत?

हिमाचल प्रदेशमध्ये टपाल विभागाने स्काय एअर मोबिलिटीसोबत पार्टवरशिप केली आहे. येथील दुर्गम भागांना जोडण्यासाठी एकूण ११० ड्रोन मार्गांवर काम सुरू आहे. एका मार्गावरील चाचणीत प्रभावी परिणाम दिसून आले आहेत. याच्या मदतीने ज्या टपालाची डिलिव्हरी करायला २ तास लागतात ते आता ड्रोनच्या मदतीने ७ मिनिटांत डिलिव्हर करता येणार आहे. वेळेतील हा फरक फार मोठा असून या तंत्रज्ञानाने भारतीय टपाल विभागाला डोंगराळ विभागात डिलिव्हरी करताना मोठी मदत होऊ शकते.

ईशान्येकडील आसाम राज्यातही ड्रोन डिलिव्हरीसाठी एकूण ४० वेगवेगळे रुट्स आखण्याचा प्लॅन तयार करण्यात आला आहे. नदी आणि जंगलांनी वेढलेल्या परिसरात औषधे, कागदपत्रे किंवा महत्त्वपूर्ण पार्सल लवकरात लवकर डिलिव्हर करण्यासाठी या ड्रोन तंत्रज्ञानाची मोठी मदत घेतली जाईल जी निश्चितच विभागासाठी फायद्याची ठरेल. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील लॉजिस्टिक्स आणि डिलिव्हरीच्या संपूर्ण प्रक्रियेत परिवर्तन घडेल.

India Post is taking to the skies! 📮🚁 Drone mail operations have begun in Assam, with 40 routes planned, alongside 110 in Himachal with Skye Air Mobility. One Himachal route has already cut a 2-hour journey to just 7 minutes. Even our oldest institutions can learn to fly! 🇮🇳 pic.twitter.com/uKqCdKRBiU — Harsh Goenka (@hvgoenka) August 29, 2026

CNG स्टेशनवर गॅस भरताना पाइप अचानक फुटला; २४ वर्षीय कर्माचाऱ्याचा जागीच मृत्यू; घटनेचा Live Video Viral

आरपीजी ग्रुपचे चेअरमन हर्ष गोएंका आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत याची माहिती शेअर केली आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये या नव्या उपक्रमाची माहिती त्यांनी यूजर्ससोबत शेअर केली. व्हिडिओमधील ड्रोन घरी टपालाची डिलिव्हरी करत आहे हे पाहून अनेकजण थक्क झाले आणि लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. एका यूजरने म्हटले की, “उशिरा का होईना, पण झाले हेच महत्त्वाचे. इंडियापोस्ट अनेक दशकांपासून सुस्त होती. निराशाजनक बाब ही आहे की, ई-कॉमर्स अस्तित्वात येण्याच्या अनेक दशकांपूर्वीच इंडियापोस्टने सर्वात कठीण गोष्ट, म्हणजेच प्रत्यक्ष पोहोच, आधीच हाताळली होती”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “चांगले प्रयत्न…फक्त लोकांनी ड्रोनचे नुकसान करू नये”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “तंत्रज्ञानाचा हा सर्वोत्तम वापर आहे – सर्वात दुर्गम भागांपर्यंत सर्वप्रथम पोहोचणे”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: India post launches drone delivery for remote areas like assam himachal viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • India Post
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

हा आहे पाकिस्तानचा फेक डाॅमिनोज, इथे मेन्यूपासून सर्वकाही आहे बनावटी! परदेशी पर्यटकाने केला पर्दाफाश; Video Viral 
1

हा आहे पाकिस्तानचा फेक डाॅमिनोज, इथे मेन्यूपासून सर्वकाही आहे बनावटी! परदेशी पर्यटकाने केला पर्दाफाश; Video Viral 

CNG स्टेशनवर गॅस भरताना पाइप अचानक फुटला; २४ वर्षीय कर्माचाऱ्याचा जागीच मृत्यू; घटनेचा Live Video Viral
2

CNG स्टेशनवर गॅस भरताना पाइप अचानक फुटला; २४ वर्षीय कर्माचाऱ्याचा जागीच मृत्यू; घटनेचा Live Video Viral

समुद्रकिनाऱ्यावर प्रियकरासोबत फिरत होती महिला, तितक्यात अंगावर कोसळली वीज; मृत्यूचा धडकी भरवणारा Video Viral
3

समुद्रकिनाऱ्यावर प्रियकरासोबत फिरत होती महिला, तितक्यात अंगावर कोसळली वीज; मृत्यूचा धडकी भरवणारा Video Viral

नेपाळ पुरातील सर्वात भावूक क्षण! कुटुंबाच्या प्राणांसाठी बापाने पणाला लावला जीव; भावूक करणारा Video Viral
4

नेपाळ पुरातील सर्वात भावूक क्षण! कुटुंबाच्या प्राणांसाठी बापाने पणाला लावला जीव; भावूक करणारा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.