Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महासागराचं रहस्य उलगडलं! समुद्रकिनाऱ्यावर सापडला 150 वर्षांचा शार्क; पाहून शास्त्रज्ञांनाही बसला धक्का

समुद्रातील गूढ पुन्हा एकदा समोर आले आहे. आयर्लंडमधील Finisklin Beach येथे एका अत्यंत दुर्मिळ Greenland sharkचा मृतदेह आढळून आल्याने शास्त्रज्ञांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 18, 2026 | 10:13 AM
महासागराचं रहस्य उलगडलं! समुद्रकिनाऱ्यावर सापडला 150 वर्षांचा शार्क; पाहून शास्त्रज्ञांनाही बसला धक्का

महासागराचं रहस्य उलगडलं! समुद्रकिनाऱ्यावर सापडला 150 वर्षांचा शार्क; पाहून शास्त्रज्ञांनाही बसला धक्का

Follow Us
Follow Us:
  • आयर्लंडमध्ये प्रथमच इतका दुर्मिळ ग्रीनलँड शार्क किनाऱ्यावर आढळला.
  • हा शार्क सुमारे 150 वर्षांचा असून, जगातील सर्वाधिक आयुष्य असलेल्या प्राण्यांपैकी एक मानला जातो.
  • शास्त्रज्ञ त्याचा सखोल अभ्यास करून या रहस्यमय प्रजातीबद्दल अधिक माहिती मिळवणार आहेत.
समुद्राच्या आत खोलवर अनेक रहस्ये दडलेली असतात ज्यांची माहिती आपल्याला नाही. जेव्हा एखादा दुर्मिळ जीव समुद्रातून बाहेर येतो तेव्हा आपल्याला त्याची माहिती मिळते. अलिकडे असेच काहीसे घडून आले आहे. आयर्लंडमधील स्लिगो काउंटीमधील फिनिस्क्लिन बीचवर एका अत्यंत दुर्मिळ आणि रहस्यमय शार्क माशाचा मृतदेह आढळून आला. हा मासा साधासुधा नसून तो तब्बल 150 वर्षे जगलेला मासा असल्याचे म्हटले जात आहे. मासा जेव्हा समुद्रकिनाऱ्यावर सापडला तेव्हा त्याला पाहून शास्त्रज्ञही अवाक् झाले. कारण अनेक शेकडो वर्षे जगणारा हा दुर्मिळ शार्क पहिल्यांदाच समुद्रकिनाऱ्यावर आढळून आला होता.

मृत्यूच्या काही वेळेआधी कानात घुमतात ‘हे’ शब्द, मरणाच्या दारातून परतलेल्या व्यक्तीने उघड केले सत्य

माहितीनुसार, शनिवार, ११ एप्रिलच्या संध्याकाळी, IWDG लाइव्ह स्ट्रँडिंग हॉटलाइनला २-मीटर लांबीच्या एका मृत बास्किंग शार्कबद्दल माहिती मिळाली. मात्र, ते शोधणाऱ्या जेम्स आणि हमाद यांनी पाठवलेल्या फोटोंवरून लगेचच हे स्पष्ट झाले की, तो बास्किंग शार्क नव्हता, तर किनाऱ्यावर सापडण्याची ही एक अत्यंत दुर्मिळ आणि रंजक घटना होती. हा शार्क ग्रीनलँड प्रजातीचा असून जगातील सर्वाधिक काळ जगणाऱ्या पृष्ठवंशीय प्राण्यांपैकी तो एक मानला जातो. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, या शार्कची लांबी ४ ते ६ मीटरपर्यंत पोहोचते. ते सुमारे १५० वर्षांच्या वयात लैंगिकदृष्ट्या प्रौढ होतात आणि ८ ते १८ वर्षांच्या गर्भावस्थेच्या कालावधीनंतर आपल्या पिल्लांना जन्म देतात.

जिथे फ्री तिथे मी! मेलेल्या कोंबड्या लुटण्यासाठी लोकांची गर्दी, कधीही पाहिली नसावी अशी लूट… घटनेचा Video Viral

हम्माद चौधरी आणि जेम्स विंटर्स ओ’डोनेल या दोन स्थानिक रहिवाशांनी समुद्रकिनाऱ्यावर फिरत असताना हा शार्क पाहिला असल्याचे सांगण्यात येत आहे. IWDG च्या मते, आयर्लंडमध्ये नोंदवलेली ही अशा प्रकारची पहिलीच घटना आहे, ज्यामुळे हा शोध अधिकच विशेष ठरतो. वृत्तानुसार, शार्कचा शोध लागल्यानंतर त्याला आयर्लंडच्या नैसर्गिक इतिहास संग्रहालयात पाठवण्यात आले आहे. इथे शास्त्रज्ञ त्याचा सखोल अभ्यास करतील. संग्रहालयाच्या म्हणण्यानुसार, या दुर्मिळ प्रजातीबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी त्याचे ऊतक आणि शरीराचे अवयव जतन केले जातील. जर त्याची त्वचा चांगल्या स्थितीत राहिली, तर ती संग्रहालयात प्रदर्शनासाठीही ठेवली जाऊ शकते, ज्यामुळे लोकांना या रहस्यमय प्राण्याबद्दल अधिक जाणून घेता येईल.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Ireland finisklin beach greenland shark 150 years rare discovery revealed viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 09:15 AM

Topics:  

  • Beach
  • viral news
  • viral photo
  • viral post

संबंधित बातम्या

काय सांगता सापदेखील निघाला Oggy चा फॅन, चिमुकल्याच्या शेजारी बसून पाहू लागला कार्टून; मजेदार Video Viral
1

काय सांगता सापदेखील निघाला Oggy चा फॅन, चिमुकल्याच्या शेजारी बसून पाहू लागला कार्टून; मजेदार Video Viral

बापरे! तुरुंगात जाण्याच्या भितीने व्यक्तीने स्वत:ला जिवंतपणीच पुरले, घटनेने पोलिसही थक्क
2

बापरे! तुरुंगात जाण्याच्या भितीने व्यक्तीने स्वत:ला जिवंतपणीच पुरले, घटनेने पोलिसही थक्क

खोदकाम करताना मजुराला सापडली सुई टोचलेली बाहुली, खिळा काढताच म्हणाला, “कुणाची तरी मुक्तता झाली”; Video Viral
3

खोदकाम करताना मजुराला सापडली सुई टोचलेली बाहुली, खिळा काढताच म्हणाला, “कुणाची तरी मुक्तता झाली”; Video Viral

मुंबई लोकलमध्ये तृतीयपंथीयांचा धिंगाणा? प्रवाशाला लाथा-बुक्क्यांनी मारलं,साडी वर केली अन्….; Video Viral
4

मुंबई लोकलमध्ये तृतीयपंथीयांचा धिंगाणा? प्रवाशाला लाथा-बुक्क्यांनी मारलं,साडी वर केली अन्….; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.