पाकिस्तानात भारतीय संस्कृतीचे दर्शन; नवरात्री उत्सव साजरा करताना दिसले लोक, VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Pakistan Navratri Video : आज नवरात्रीचा सहावा दिवस आहे. संपूर्ण देशभरात नवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही नवरात्रीचा उत्सव रंगला आहे. धक्कादायक बाब म्हणजे भारताचा सर्वात मोठा शत्रू देश पाकिस्तानमध्येही भारतीय संस्कृतीचा प्रभाव दिसून आला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की, पाकिस्तानमध्ये नवरात्री खेळली जात आहे.
हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. अनेकांनी याचे कौतुकही केले आहे. भारतीय संस्कृती पाकिस्तानमध्ये पाहायला मिळणे ही आश्चर्याची बाब असल्याचे लोकांनी म्हटले आहे. पण म्हणतात ना की कितीही शत्रूत्व असूद्यात अनेकदा सण, उत्सव माणसांना एकत्र आणतातच. पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या हिंदू प्रीतम देवारिया याने त्याच्या preetam_devria या इन्स्टाग्राम अकाउटंववर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
यामध्ये त्याने सांगितले आहे की, पाकिस्तानच्या कराचीमध्ये त्याला नवरात्रीचा आनंद अनुभवायला मिळला. त्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमुळे आंनदाचे वातावरण पसरले आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यांवर मंडप बांधण्यात आले आहेत. लाईटींना सजवण्यात आले आहे. गाणी सुरु असून लोकांची मोठी गर्दी आहे. लोक गोल करुन गरबा, दांडिया खेळताना दिसत आहेत.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर आनंद व्यक्त केला आहे. अनेकांनी एक मुस्लिम देश भारतीय संस्कृतीचा आनंदा साजरा करत असल्याचा हा अभिमानाच क्षण असल्याचे म्हटले आहे. अनेकांनी जय माता दी अशी प्रतिक्रिया दिली आहे. काही लोकांनी पाकिस्तानमधील हिंदू लोकांच्या जीवनावर प्रश्न विचारले आहेत. तर काहींनी पाकिस्तानमध्ये शाकाहारी किंवा जैन लोक आहेत का असा प्रश्न केला आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर भारतीयांतकडून पसंती मिळत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.