परिक्षेला कंटाळेला चिमुकल्याचा हा व्हिडिओ पाहिला का? पाहून खळखळून हसाल
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहिल्यावर विश्वास बसत नाही. तर अनेकदा असे मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अलीकडे तर लहान मुळे देखील भन्नाट असे रील्स बनवून सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. ही लहान मुले इतकी निरागस असतात की त्यांचे व्हिडिओ आपण पुन्हा पुन्हा पाहतो.
सध्या असाच एका व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ एका 6-7 वर्षाच्या चिमुकल्याचा आहे. हा चिमुकला परिक्षेचे दुख: व्यक्त करत आहे. याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रामणात व्हायरल होत आहे. त्याने असे काही बोलले आहे की, सगळेजण ऐकून हैराण झाले आहेत. तुम्ही देखील हा व्हिडिओ पाहा, व्हिडिओ पाहून इतके खळखळून हसाल की डोळ्यातून पाणी येईल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.
व्हायरल व्हिडिओच्या सुरूवातीला चिमुकला म्हणतो की, मित्रानो, एक गडबड झाली आहे. त्याचा दुसऱ्या दिवशी वाढदिवस आहे आणि परिक्षा पण आहे. रोज असेच होते. परिक्षा कोणी काढल्या. मी मोठा झाल्यावर परित्राच बंद करून टाकणार आहे मग सगळे मस्ती करा, मजा, फिरायला जा. असे म्हणतो. एवढेच नाही तर तो म्हणदतो की, कधी वेळ येणार की मी परिक्षा बंद करू शकेल. एक्झाम बॅन केल्यावर शाळेत पण जावे लागणार नाही. माझे तर डोक खराब झाले. असे सगळे तो म्हणतो. त्याचे हे म्हणणे ऐकून अनेकजण हैराण झाले आहेत.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावर avi.rashi या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. लाखोहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आणि लाईक केला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रीया देकील दिल्या आहेत एका युजरने म्हटले आहे की, हो बरोबर बोलला चांगला निर्णय बेटा तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, भाऊ, आत्तापासूनच कंटाळायल, तिसऱ्या एकाने म्हटले आहे की, भाऊ माझा तुला पूर्ण सपोर्ट आहे तर आणकी एका युजरने म्हटले आहे की, भाऊ तुम्ही नक्की परिक्षा बंद करणार ना? असा प्रश्न विचारला आहे. तर अनेकांनी यावर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.
हे देखील वाचा- बाईईईईईईईई हा काय प्रकार? महिलांचा ‘असा’ डान्स पाहून लोक हसूनहसून लोटपोट म्हणाले…