फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा असे व्हिडिओआपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. तर अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात. जे पाहिल्यावर हसावे की रडावे कळत नाही. भांडणाचे, डान्सचे, जुगाडाचे स्टंट करणाऱ्यांचे असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकजणांच्या डोळ्यात हसूनहसून पाणी आले आहे.
हा व्हिडिओ काही महिलांचा आहे. जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या महिलांनी केलेला डान्स बघून सगळेजण हैराण झाले आहेत. रस्त्यावर काकूंनी असा अप्रतिम डान्स केला की कुणाचेही डोळे पाणावले. हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही. अनेकांनी हा डान्स करण्याचा कोणता प्रकार आहे असे विचारले आहे. तर अनेकांनी व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहे.
व्हायरल होत असलेल्या काही सेकंदांच्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर ढोल वाजत आहे. तिथे अनेकजण बसलेले आहेत. यामध्ये ढोल वाजवले जात असून काही काकूंनी लगेच मैदानात उडी मारून नाचण्यास सुरुवात केली. सुरुवातीला नृत्य सामान्य होईल असे वाटते. पण काही सेकंदातच काकूंनी असा खळबळ माजवला की संपूर्ण सोशल मीडिया हादरला. नेटकरी त्यांचा असा जान्स पाहून डान्सला झिरो ग्रॅव्हिटी असलेला डान्स म्हणत आहेत. काकुंचा व्हिडिओ पाहून अनेकजण आश्चर्यात पडले आहेत.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावर videonation.teb या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून, व्हिडिओला आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. यावर अनेकांनी आपल्या भन्नाट प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, भाऊ, यांच्या पुढे तर प्रोफेशनल डान्स करणारे देखील फिके आहेत. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, काकु झिरो ग्रॅव्हिटी डान्स करत आहे, तर आणखी एका युजरने बाईईईईईईईई हा काय प्रकार असे म्हटले आहे. चौथ्या एका युजरने हसण्याचे इमोजी शेअर करत म्हटले आहे की, या महिलांना ऑवार्ड दिला पाहिजे. अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहे.
हे देखील वाचा – ‘हाय रे हाय तेरा ठुमका’ गाण्यावर काकांनी खेळला जबरदस्त गरबा; पाहून नेटकरी म्हणाले…