Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रीलसाठी चिमुकलीचा जीव घेणार का? पालकांनीच हद्द केली पार, पाहून तुमचाही राग अनावर होईल; संतापजनक Video Viral

Shocking Viral Video: रिलच्या दुनियेत असे रमले आई-वडील की त्यांना स्वतःच्या मुलीचीही दया आली नाही. घरंगळत खाली पडू लागली चिमुकली अन् आई-वडील बनवत राहीली रील, पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 07, 2025 | 03:15 PM
रीलसाठी चिमुकलीचा जीव घेणार का? पालकांनीच हद्द केली पार, पाहून तुमचाही राग अनावर होईल; संतापजनक Video Viral

रीलसाठी चिमुकलीचा जीव घेणार का? पालकांनीच हद्द केली पार, पाहून तुमचाही राग अनावर होईल; संतापजनक Video Viral

Follow Us
Follow Us:

सध्याचे योग्य हे सोशल मीडियाचे युग आहे असे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आजकाल प्रत्येक लहानातली लहान गोष्ट इंटरनेटवर शेअर केली जाते. लोक स्वतःला व्हायरल करण्यासाठी वाटेल त्या थराला जाऊ पाहतात. दररोज इथे हजारो व्हिडिओ शेअर होतात ज्यातील काही लोकांचे लक्ष वेधून घेतात आणि म्हणूनच कमी काळात ते व्हायरल होतात. यात कधी स्टंट्स करून दाखवले जातात तर कधी जुगाड. आता तर लहान मुलेही यात तरबेज झाली आहेत, मोठ्यांचीच काय तर लहानांचेही अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

मुलांच्या या व्हिडिओमध्ये त्यांचा पालकांचाही मोठा हाथ असतो. चिमुकल्यांचे गोंडस प्रकार पाहून युजर्स त्यांच्यावर भाळतात आणि असे व्हिडिओ वेगाने शेअर होतात. हेच कारण आहे की, आजकाल पालक शुल्लक फेमसाठी आपल्या लहान मुलांचे व्हिडिओ तयार करून त्यांच्याकडून नको नको ते करून घेतात. अनेकदा या रीलसाठी पालक आपल्या मुलांच्या जिवाचीही पर्वा करत नाहीत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात पालकांच्या चुकीमुळे चिमुकलीचा जीव टांगणीला लागल्याचे दिसून आले. व्हिडिओतील दृश्ये पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल.

माझ्या हद्दीत येते का? मगरीला पाहताच सिंहाला राग अनावर; असे पळवून लावले की पाहूनच हसू अनावर होईल; Video Viral

काय आहे व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात दिसते की, एक चिमुकली मंदिराच्या पायऱ्यांवरून खाली उतरत आहे. यावेळी त्या दगडी पायऱ्या इतक्या लांब असतात की चिमुकलीला त्यावरून नीट खाली उतरता येत नाही. तो दचकत दचकत पायऱ्यांवरून कशीबशी खाली उतरण्याचा प्रयत्न करते. यावेळी तिचे पालक मागून तिचा व्हिडिओ शूट करत असतात. आपल्या मुलीला होणारा त्रास त्यांना दिसत नाही आणि मग शेवटी नको तेच घडते. पुढच्याच क्षणी चिमुकलीचा तोल ढासळतो आणि ती खाली घरंगळत खाली पडू लागते. सुदैवाने यावेळी खाली एक आजोबा वर चढत असतात जे चिमुकलीला खाली पडत असल्याचे पाहतात आणि तिला आपल्या हाताने तिला पकडतात. विशेष म्हणजे याक्षणीही मुलीचे पालक मागून तिचा व्हिडिओ शूट करत असतात, जे पाहून अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात जाते. युजर्स आता पालकांवर भडकले असून व्हिडिओवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

चालू ट्रेनमध्ये व्यक्तीचे अश्लील कृत्य! गुपचूप गेला अन् बायकोसमोरच दुसऱ्या पुरुषाला केले किस; धक्कादायक Video Viral 

हा व्हायरल व्हिडिओ @marathi_songs143 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो युजर्सने पाहिले असून अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “लोक रिल बनवण्यासाठी पागल झाले आहेत…” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खुपच निष्काळजीपणा…… त्या लहानश्या जीवाला किंती लागलं असेल, वरून रील बनवून पोस्ट पण गेली….”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Little girl fell down from temple stairs while her parents making reel everyone get shocked viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2025 | 03:11 PM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

How To Kill Man? मेट्रोत पुस्तक उघडलं अन् प्रवाशांचे डोळेच विस्फारले! टायटल पाहून पुरुषांची उडाली झोप
1

How To Kill Man? मेट्रोत पुस्तक उघडलं अन् प्रवाशांचे डोळेच विस्फारले! टायटल पाहून पुरुषांची उडाली झोप

रिल बनवण्याचं हे कसलं वेड! पावसात व्हिडिओ शूट करत होती तरुणी; मागून भरधाव बस आली अन्…, Video Viral
2

रिल बनवण्याचं हे कसलं वेड! पावसात व्हिडिओ शूट करत होती तरुणी; मागून भरधाव बस आली अन्…, Video Viral

धक्कादायक! कोब्राने तोंडातून मृत नागीणीला काढलं बाहेर, रेस्क्यूदरम्यानचे दृष्य पाहून सर्पमित्रही चक्रावले; Video Viral
3

धक्कादायक! कोब्राने तोंडातून मृत नागीणीला काढलं बाहेर, रेस्क्यूदरम्यानचे दृष्य पाहून सर्पमित्रही चक्रावले; Video Viral

क्षणात खेळ खल्लास! उंचावर फोटो काढायला गेला, पाय घसरला अन् थेट…, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO
4

क्षणात खेळ खल्लास! उंचावर फोटो काढायला गेला, पाय घसरला अन् थेट…, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.