(फोटो सौजन्य: Twitter)
जंगलातील जीवन हे मानवी जीवनाहून फार वेगळे असते. इथे नेहमीच अनेक मनोरंजक गोष्टी घडत असतात ज्या आपल्याला थक्क करतात. आताही इथे मगर आणि सिंहातील एका मिश्किल शीतयुद्धाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्ये तुम्हाला पोट धरून हसवतील. वास्तविक सिंहाला जंगलाचा राजा मानले जाते तर मगरीला पाण्यातील राक्षस अशी उपमा देण्यात आली आहे. दोघेही आपआपल्या राज्याचे राजे आहेत. त्यांच्या हद्दीत कोणी घुसलं की मग त्याची काही खैर नाही.
तुम्ही आजवर सोशल मीडियावर मगर आणि सिंहाच्या लढतीचे अनेक व्हायरल व्हिडिओ पाहिले असतील. दोघेही आपल्या बलाढ्य शक्तीने आणि चातुर्याने भल्याभल्यांना आपली शिकार बनवतात आणि म्हणूनच दोघेही जंगलातील सर्वात धोकादायक प्राणी म्हणून ओळखले जातात. अशात आता समोर आलेल्या व्हिडिओत एक मगर आणि सिंहातील एक रंजक दृश्य दिसून येत आहे जे आता सर्वांचेच मनोरंजन करत आहेत. व्हिडिओतील दृश्ये पाहून नक्कीच तुम्हाला हसू फुटेल. यात नक्की काय घडले ते जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
हा व्हायरल व्हिडिओ राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील रणथंबोर राष्ट्रीय उद्यानाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये एक मगर तलावाच्या बाहेर जमिनीवर विसावा घेत असल्याचे दिसते. तितक्यात तिथे जंगलाच्या राजाची म्हणजेच वाघाची एंट्री होते. आता हे एक असे दृश्य आहे जे जे दुर्मिळ क्षणांमध्ये गणले जाऊ शकते. मगरीला पाण्यातून बाहेर जंगलाच्या हद्दीत विसावल्याचे पाहताच सिंह रागाने मगरीच्या दिशेने धावत सुटतो. वाघ आपल्याकडे धावत आल्याची चाहूल लागताच मगर घाबरते आणि पुढच्याच क्षणी पळत पळत पाण्यात जाऊन गायब होते. मगर पाण्यात गेल्याचे पाहताच सिंह थांबतो आणि आपली वाट बदलत तेथून निघून जातो. हे संपूर्ण दृश्य मजेदार वळण घेते जे पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर हसू येते.
जंगलातील हे मजेदार दृश्य @battilalgurjar_ranthambhore नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिले असून अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका युजरने लिहिले आहे, “मगर – मी नद्यांचा राजा आहे. वाघ – तुझ्या नद्या माझ्या प्रदेशात वाहतात” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “दोघेही आपापल्या झोनचे राजे आहेत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.