(फोटो सौजन्य: Twitter)
ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी ट्रेनच्या टॉयलेटमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा व्हिडिओ व्हायरल होतो तर कधी तर कधी सीटवरून प्रवाशांमध्ये होणाऱ्या राड्यांचे व्हिडिओ व्हायरल होतो. यात, अनेकवेळा असे व्हिडीओही समोर येतात, ज्यातील दृश्ये आपलं डोकं चक्रावतील. आताही इथे अशीच एक घटना व्हायरल झाली आहे ज्यातील दृश्ये तुमच्या कल्पनेपकडची आहेत. यात एका पुरुषाला दुसऱ्या पुरुषाला जबरदस्ती किस केल्याची घटना घडली आहे. नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.
रेल्वेत मुलींची छेडछाड करणाऱ्या बदमाशांचे व्हिडिओ तुम्ही अनेकदा पाहिले असतील. यावेळी जे प्रकरण समोर आले आहे ते पाहून तुम्हाला धक्का बसेल. वास्तविक, ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने चालत्या ट्रेनमध्ये एका दुसऱ्या पुरुषाचे चुंबन घेतले. या सर्व प्रकारानंतर संपूर्ण ट्रेनमध्ये एकच मोठा गोंधळ उडाला. हे प्रकरण अक्षरशः अगदी मारामारीपर्यंत पोहचले.
काय आहे व्हिडिओत?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ट्रेनच्या डब्यात मोठी गर्दी दिसत आहे. गर्दी इतकी आहे की पाय ठेवायलाही जागा नाही. यादरम्यान एक व्यक्ती ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशावर संतापलेला असतो आणि दावा करतो की तो झोपला असताना समोर बसलेल्या प्रवाशाने जबरदस्तीने त्याचे चुंबन घेतले. इतकंच नाही तर ट्रेनच्या खालच्या बर्थवर बसलेला प्रवासीही हे मान्य करतो. यावेळी चुंबन घेतलेल्या व्यक्तीची पत्नीही तेथे उपस्थित असते. व्यक्तीच्या या कृत्यावर तो पुरुष चवताळून उठतो आणि त्याला मारहाण करू लागतो. यावेळी व्यक्तीची पत्नी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसून येते. हा व्हिडिओ नक्की कुठला आणि कधीचा आहे याबाबत मात्र कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
The guy kissed another guy in train while sleeping.
Then said- “maaf kardo, chhod de”All the bystanders are not even taking this seriously until the man started to get beaten. pic.twitter.com/YtQP3P7cG2
— ShoneeKapoor (@ShoneeKapoor) March 4, 2025
या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ @ShoneeKapoor नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘त्या माणसाने झोपेत असताना ट्रेनमध्ये दुसऱ्या माणसाचे चुंबन घेतले आणि मग मला माफ करा, सोडा असे म्हणू लागला. त्या माणसाला मारहाण होईपर्यंत कोणीही याबाबत आवाज उठवला नाही’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी कमेंट्स करत या प्रकारावर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “तू बरोबर केलेस भाऊ… हेच करायला हवे होते. शाब्बास, धडा शिकवला. तो यापुढे असे कधीच करणार नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “दुःखद वास्तव”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.