Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुंभमेळ्यातील मोनालिसाने केलं मुस्लिम बॉयफ्रेंडसोबत लग्न; दिग्दर्शक म्हणाला, “लव्ह जिहादची बळी”; इंटरनेटवर Video Viral

२०२५ च्या महाकुंभ मेळ्यात व्हायरल झालेल्या मोनालिसाने मुस्लिम बॉयफ्रेंडसोबत लग्न केल्याने सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. मोनालिसाला चित्रपटात काम देणाऱ्या दिग्दर्शकाने प्रतिक्रिया देत याला लव्ह जिहादचा बळी म्हटलं आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 12, 2026 | 09:53 AM
कुंभमेळ्यातील मोनालिसाने केलं मुस्लिम बॉयफ्रेंडसोबत लग्न; दिग्दर्शक म्हणाला, "लव्ह जिहादची बळी"; इंटरनेटवर Video Viral

कुंभमेळ्यातील मोनालिसाने केलं मुस्लिम बॉयफ्रेंडसोबत लग्न; दिग्दर्शक म्हणाला, "लव्ह जिहादची बळी"; इंटरनेटवर Video Viral

Follow Us
Follow Us:
  • मोनालिसाने तिचा प्रियकर फरमान खानसोबत कोर्ट मॅरेज केल्याची माहिती समोर आली असून हे लग्न केरळमध्ये पार पडले.
  • मोनालिसाच्या कुटुंबाला हे नाते मान्य नसल्यामुळे तिने तिरुवनंतपुरम येथील पोलीस ठाण्यात जाऊन संरक्षणाची विनंती केल्याचे सांगितले जाते.
  • दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मोनालिसा लव्ह जिहादची बळी ठरल्याचा दावा केला आहे.
२०२५ च्या महाकुंभ मेळ्यात अनेक लोक फेमस आणि चर्चित ठरली. यातीलच एक लोकप्रिय चेहरा म्हणजे मोनालिसा. आपल्या नैसर्गिक साैंदर्यामुळे कुंभमेळ्यात दिसून आलेली मोनालिसा सोशल मिडियावर चांगलीच ट्रेंडिंग राहिली. तिची प्रसिद्धी इतकी वाढली की नंतर तिला चित्रपटातही काम करण्याची संधी मिळाली. अशातच आता माहिती मिळत आहे की मोनालिसाने नुकतेच लग्न केले असून मुस्लिम बाॅयफ्रेंडसोबत तिने लग्नगाठ बांधली आहे. तिच्या या लग्नाच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले असून तिचे हे लग्न लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचा दावा केला जात आहे.

हातात जेवणाचा घास अन् डोळ्यात आले अश्रू; डिलिव्हरी बॉयला जेवायला घालताच भावुक झाला आणि म्हणाला, “दिवसभर उपाशी हे विसरूनच गेलो”

कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न

माहितीनुसार, मोनालिसाने तिच्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध फरमान खानशी लग्न केले. प्रियकर फरमान खान आणि मोनालिसा दीड वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते परंतु तिच्या कुटुंबाला पूर्वीपासून त्यांचे हे नातं मान्य नव्हतं. तिने स्पष्ट केले की म्हणूनच ती लग्नासाठी केरळला गेली आणि पोलिस संरक्षणाची विनंती केली. लग्नापूर्वी, मोनालिसा आणि फरमान बुधवार, ११ मार्च रोजी तिरुवनंतपुरममधील थंपनूर पोलिस स्टेशनमध्ये गेले. तिथे मोनालिसाने पोलिस संरक्षणाची विनंती केली आणि सांगितले की तिचे वडील तिला जबरदस्तीने घरी नेण्याचा प्रयत्न करत आहेत.

वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की मोनालिसा प्रौढ आहे आणि तिला पाहिजे त्या व्यक्तीशी लग्न करू शकते. मोनालिसाने स्पष्ट केले की ती आणि फरमान खान केरळमध्ये “द डायरी ऑफ मणिपूर” चित्रपटाचे शूटिंग करत होते आणि तेव्हाच त्यांची भेट झाली. फरमानने स्पष्ट केले की मोनालिसाने सुरुवातीला त्याला प्रपोज केले होते, परंतु त्याने नकार दिला होता. तथापि, नंतर ते प्रेमात पडले.

सर्वांना यमलोकी पाठवणाऱ्या किंग कोब्राचा कसा होतो मृत्यू, भीषण अवस्था अन् धक्क्कादायक दृश्यांनी भरलाय Viral Video

मोनालिसाच्या अचानक झालेल्या लग्नाने सर्वांनाच धक्का बसला आहे. तिच्या कुटुंबाचेही मन दुखावले आहे. “द मणिपूर डायरी” द्वारे तिला चित्रपटांमध्ये लाँच करणारे दिग्दर्शक सनोज मिश्रा देखील धक्का बसले आहेत. त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे, ज्यामध्ये त्यांनी दावा केला आहे की मोनालिसा लव्ह जिहादची बळी ठरली आहे. सनोजने असाही दावा केला आहे की मोनालिसाने प्रेमातून नव्हे तर प्रलोभनातून लग्नाचे पाऊल उचलले आणि तिच्या मॅनेजरने तिला दक्षिण भारतात विकले होते.

मोनालिसाने फरमान खानसोबत कोर्ट मॅरेज केले आणि त्यानंतर तिरुवनंतपुरममधील अरुमानूर नैनार मंदिरात हिंदू रितीरिवाजानुसार सात वचने घेतली. आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये पती फरमान मोनालिसाच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये, कोर्ट मॅरेजनंतर दोघेही लग्नाचे प्रमाणपत्र हातात घेऊन कोर्टात उभे आहेत.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Mahakumbh mela viral girl monalisa marries muslim boyfriend director says victim of love jihad viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 09:06 AM

Topics:  

  • Kumbh Mela
  • Love Jihad
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
1

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
2

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
3

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
4

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.