Man describe Punjab Flood situation in English in Funny way video viral
सध्या पंजाबमध्ये भीषण पूरामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. अनेकांची घरे, रस्त पाण्याखाली गेली आहे. मदत आणि बचाव कार्यही वेगाने सुरु आहे. पुरात अडकेल्या लोकांपर्यंत मदत पोहोचवली जात आहे, त्यांना बाहेर काढले जात आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर एक अजब व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका पत्रकाराने पुरात अडकलेल्या एका व्यक्कीला प्रश्न विचारले आहे. यावर त्याने असे काही उत्तर दिले आहे की, संपूर्ण सोशल मीडियावर हशा पिकला आहे.
सध्या या व्हिडिओची सर्वत्र चर्चा सुरु आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका पत्रकाराने व्यक्तीला पंजाबमध्ये पूर का आला आहे असा प्रश्न केला. यावर व्यक्तीने इंग्रजीमध्ये उत्तर देण्यास सुरुवात केली. त्याने असे उत्तर दिले आहे की, हसून हसून तुमचे पोट दुखून येईल. उत्तर ऐकून भल्या भल्यांनाही इंग्रजी विसरायला भाग पडेल. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सध्या भारतातच्या उत्तर पंजामध्ये मूसळधार पाऊस आला आहे. यामूळे तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक लोकांना आपली घरे सोडून जावे लागले आहे. यावर व्यक्तीला प्रश्न विचाण्यात आला होता, यावर व्यक्ती इंग्रजीत उत्तर देतो. तो म्हणतो की, ‘पूर म्हणजे हिमालय पर्वत, हाच पाऊस.. आणि हाच चीन आहे, हे महायुद्ध आहे आणि तुम्ही नरेंद्र मोदींना हे काय आहे हे सांगितले नाही…’ यानंतरही व्यक्तीची बडबड सुरुच आहे.
व्हायरल व्हिडिओ
पत्रकार ने पंजाब में आई बाढ़ के बारे में पूछा।
भाई साहब का रिप्लाई सुनिए!😂 pic.twitter.com/2Dbf6IDR2E
— Ankit Kumar Avasthi (@kaankit) September 4, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @kaankit या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी या व्हिडिओची मज्जा घेतील आहे. यावर प्रतिक्रिया देताना एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, भाऊची इंग्रजी ऐकून मी इंग्रजी विसरलो, तर दुसऱ्या एकाने, भाऊ कोणत्या शाळेतून शिकला तुम्ही असा प्रश्न केला आहे. तिसऱ्या एकाने अशा परिस्थितीतही यांना इंग्रजी सुचतेय असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.