जीवघेणी ठरली ती एक चूक! ट्रेनने तरुणाला अक्षरशः 500 मीटरपर्यंत फरफटत नेले, घटनेचा थरारक Video Viral
रेल्वे अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकजण रेल्वेसोबत अतिशहाणपणा करायला जातात आणि स्वतःच यात अडकतात. बऱ्याचदा यामुळे दुर्दुवी अपघात घडून येतात. अशा अपघातांचे व्हिडिओ बऱ्याचदा सोशल मीडियावर शेअर केले जातात, ज्यातील दृश्ये आपल्या विचारांच्या पलीकडचे असतात. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात तरुणासोबत एक भीषण प्रकार घडून आल्याचे समजते. नक्की काय घडले ते जाणून घेऊया.
काय घडले व्हिडिओत?
रेल्वे अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात घसरून प्लॅटफॉर्मवर फरफटताना दिसून येत आहे. ट्रेनच्या वेगामुळे तरुणाला पूर्णपणे ट्रेनमध्ये चढता आले नाही, त्याचा हात ट्रेनच्या हँडलला अडकला आणि बाकीचे शरीर बाहेर लटकत राहीले. घटनेतील हे दृश्ये फार भयाण आहेत, जे पाहून तुमच्या अंगावर काटा येऊ शकतो. ही घटना गांधीनगर-जयपूर मार्गावरील असल्याची माहिती मिळत आहे.सुदैवाने एका प्रवाशाने त्याचा पाय पकडून त्याला ओढले, त्यामुळे त्याचा जीव वाचला.
या व्हिडिओतून शिकायला मिळालेला धडा म्हणजे ट्रेनमध्ये चढताना आपण नेहमी सावधगिरी बाळगली पाहिजे आणि कोणत्याही प्रकारची घाई टाळली पाहिजे. एक छोटीशी चूक सुद्धा कुणाचा जीव घेऊ शकते. असे अपघात टाळण्यासाठी वेळ आणि सुरक्षिततेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. असे धोके टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा प्रवाशांना नेहमीच सतर्क करतात, मात्र प्रवाशांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे.
चलती ट्रेन में चढ़ने की कोशिश करना एक व्यक्ति को भारी पड़ गया। ट्रेन की रफ्तार पकड़ने से पहले ही वह फिसल गया और करीब 500 मीटर तक घिसटता रहा। अगर वह नीचे गिर जाता तो उसकी जान भी जा सकती थी। गनीमत रही कि वहां मौजूद किसी यात्री ने तुरंत उसके पैर पकड़कर खींच लिया, जिससे उसकी जान बच… pic.twitter.com/0qs8jhoORi
— UttarPradesh.ORG News (@WeUttarPradesh) January 31, 2025
रेल्वे अपघाताचा हा थरार @WeUttarPradesh नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “अतिउत्साही… मग ते आयुष्याशी खेळतात” दुसऱ्या युजरने लिहिले आहे,”यात चुकी मुलाची आहे…”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.