(फोटो सौजन्य: X)
लखनौच्या रस्त्यावर एक विचित्र घटना घडून आली आहे ज्यात एक महिला भररस्त्यात हाय व्होल्टेज ड्रामा करताना दिसून आली. रस्त्याच्या मधोमध बसून ती तब्बल 20 मिनिटे नाटक करत राहिली. तिचा हा सर्व प्रकार पाहून आजूबाजूचे सर्वच लोक हक्काबक्का झाले आणि तिथे एकच गोंधळ उडाला. या सर्व प्रकारामुळे स्थानिक नागरिक तसेच वाहतूक पोलिसही मोठ्या प्रमाणात हैराण झाले. नक्की काय प्रकार आहे ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडले व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओ हा लखनौचा असल्याचे समजत आहे. यात एक महिला रस्त्याच्या मधोमध आपला नको ते विचित्र प्रकार करताना दिसून आली. व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता यात एक महिला रस्त्याच्या मधोमध बसून केस मोकळे करून आपले डोके गरागरा फिरवत आहे. सुरवातीला आजूबाजूचे तिच्याकडे दुर्लक्ष करतात मात्र पुढे तिचा हा ड्रामा आणखीनच वाढू लागतो ज्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागते. सर्व गाड्या थांबतात आणि महिलेचा विचित्र प्रकार बघू लागतात.
या घटनेचा व्हिडिओ अनेकांनी आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केला. ही घटना आता सोशल मीडियावर एक चर्चेचा विषय बनली आहे. व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे, काही लोकांनी महिलेला तेथून जाण्यास सांगितले मात्र तिने कुणाचेही काही ऐकले नाही. व्हिडिओतील दृश्ये पाहून आता अनेकजण याची मजा लुटत आहेत तर काहीजण महिलेचे मानसिक संतुलन बिघडल्याचे म्हणत आहेत.
A high-voltage drama unfolded in Lucknow on Wednesday night after a woman started acting weird in the middle of the road. The incident took place outside Lohia Hospital in the Vibhuti Khand area of the city outside at around 11 pm.
This has become very common nowadays and strict… pic.twitter.com/9YC5bqqjOA
— ForMenIndia (@ForMenIndia_) March 20, 2025
स्पायडर मॅन बनत स्टंट करू पाहत होतं कपल, मग जे झालं… क्षणार्धातच सगळी हिरोगिरी उतरली; Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @ForMenIndia_ नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आता आहे. हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी कमेंट्समध्ये या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मानसिकता ठीक नाही……गरीब बाई” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भूत किंवा चुडैल नाही. हे फक्त मानसिक कृत्य आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.