Man first Proposes to his partner then to her dog video goes viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र तर कधी भयावह व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडिया श्वानांशी संबंधित अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळत आहे. अलीकडे लोक कुत्रा, मांजर यांसारखे प्राणी पाळत आहेत. विशेष करुन श्वानांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. लोक श्वानाला अगदी आपल्या घरातील सदस्यच समजतात. यामुळे कोणी त्यांच्या कुटुंबातील सदस्याला श्वानाला त्रास दिला, तर लोक भडकतात. परदेशात हे श्वानाला पाळण्याचे प्रमाण अधिक आहे.
सध्या सोशल मीडियावर यासंबंधी एक गोंडस व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुण श्वानाला प्रपोज करताना दिसत आहे. यामध्ये त्याच्या हातात एक मोठी डबी आहे, ज्यामध्ये एक रिंगचे सॉप्ट टॉ़य आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की, तरुण श्वानासमोर गुडघ्यावर ती रिंग घेऊन बसला आहे. तसेच श्वान उड्या मारताना दिसत आहे. तरुणाने डबी उघडताच श्वान ती रिंग घेऊन पळाला आहे. त्यानंतर व्हिडिओमध्ये श्वान आणि तरुण मस्ती करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “त्याला माहिती आहे की, तिला तिचा डॉग किती प्रिय आहे. यामुळे त्याने श्वानाला देखील प्रपोज केले आहे.” सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफर्म इन्स्टाग्रामवर शेअक करण्यात आला आहे. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देत प्रपोजल आवडले असल्याचे म्हटले आहे. एका युजरने आतापर्यंतचे सर्वांत बेस्ट प्रपोजल असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने किती गोड आहे असे म्हटले आहे. अशा विविध प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.