अरे अक्कल काय गहाण ठेवली का? व्यक्तिने चक्क महिलेच्या स्कर्टला लावली आग; धक्कादायक Video Viral
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे आपल्याला अनेक आगळ्या वेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर तुम्ही इथे अनेक विचित्र प्रकार व्हायरल होताना पाहिले असेल. इथे बऱ्याच अपघाताचा घटना, हास्यास्पद रिल्स आणि जुगाड असे अनेक अनोखे व्हिडिओज शेअर केले जातात. मानवाची कितीही प्रगती झाली तरी त्याच्यातील विकृती काही कमी होणार नाही. येत्या काळात असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले ज्यात मानवाची विकृत रूपे दिसून आली. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, यातील दृश्ये तुम्हाला आश्चर्याचा धक्का देतील. यात नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मीडियावर एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्ये पाहून तुम्हालाही तुमचा राग अनावर होईल. या व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, रस्त्याच्या कडेला एक महिला उभी आहे. यावेळी एक व्यक्ती महिलेच्या मागे बसलेला असतो. इथपर्यंत सर्व ठीक असतं मात्र धक्का तेव्हा बसतो जेव्हा हा व्यक्ती आपल्या हातातील लायटरने महिलेचा स्कर्ट जाळण्याचा प्रयत्न करतो. सुरवातीला ही आग कमी असल्याने महिलेला काय झाले ते समजत नाही मात्र आगीचा चटका बसताच तिला काहीतरी घडल्याचे जाणवते.
आपल्या स्कर्टला आग लागताच महिला शॉक होते आणि ही आग विझवण्याचा प्रयत्न करू लागते. व्यक्ती मात्र हे सर्व दृश्य मागून पाहत राहतो. घटनेतील हा सर्व प्रकार पाहून आता लोक हादरली आहेत. तसेच अनेक युजर्स आता व्यक्तीच्या या वागण्यावर आपला संताप व्यक्त करत आहेत. हा सर्व प्रकार तेथील एका व्यक्तीने आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करून सोशल मीडियावर शेअर केला, ज्यानंतर ही घटना व्हायरल झाली.
हा व्हायरल व्हिडिओ @teknologyoo नावाच्या इंस्टग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिले असून अनेकांनी कमेंट्समध्ये या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “किती क्रूर व्यक्ती आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कदाचित त्याला महिलेने स्कर्ट घातलेले आवडले नसावे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.