(फोटो सौजन्य:Instagram)
सोशल मिडियावर नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे अनेक अशा घटना शेअर केल्या जातात, ज्यांचा आपण कधी विचारही केला नसेल. हे व्हिडिओज कधी आपल्याला थक्क करतात, तर कधी आश्चर्याचा धक्का देऊन जातात. याचबरोबर इथे काही असे व्हिडिओ देखील शेअर होतात, ज्यांचे दृश्य आपल्याला भावूक करतात. आताही इथे एक हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात दोन वेळच्या अन्नासाठी एक महिला संघर्ष करताना दिसली. तिची ही अवस्था पाहून तुम्हालाही अश्रू अनावर होतील. यात नक्की काय घडलं आहे ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
आपली परिस्थिती आपल्याला सर्वकाही शिकवून जाते असे म्हणतात. त्या गरीबाच्या वाटेला नक्की काय दु:ख आले आहे हे फक्त त्यालाच माहिती. उपाशी पोटाचा खळगा भरण्यासाठी वेळ आली तर भिकेची याचनाही करावी लागते. यावेळी जीवाची झालेली ती काहीली सामान्यांना काय ठाऊक… सध्या सोशल मिडियावर एका अशाच घटनेशी संबंधित व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, यात काही पैशांसाठी महिलेची झालेली दुरावस्था दिसून आली. पैसे कमवण्यासाठी ती रस्त्यावर उतरली आणि तिने रस्त्यावर असे काही केले की पाहून सर्वांनाच धक्क बसला.
व्हायरल व्हिडिओतील दृश्ये पाहून तुमचेही डोळे पाणावतील. यात एक महिला भररस्त्यात आपल्या आयुष्याचा खेळ मांडताना दिसून आली. तिने यावेळी रस्त्यावर सर्वांसमोर आपल्या गळ्यात एक दोरी बांधलेली असते. यावेळी तिच्या आजूबाजूने काही लोकही येताना जाताना दिसून येतात. महिला आपले हात जोडत, डोळ्यांवर हात ठेवत गयावया करताना दिसून येते. लोकांनी काही पैसे द्यावेत हा तिचा अट्टहास असावा. व्हिडिओतील तिची अवस्था अनेकांचे हृदय हेलावून गेली. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक आता यावर आपली हळहळ व्यक्त करत आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @vishwa_9696k नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘दोन वेळेच्या जेवणा साठी किती मेहनत करावी लागते हे तुम्हाला हा व्हिडिओ पाहून कळेल’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लोखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे, “काम केलं तर नाही जमणार का….” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “घरकाम किंवा कपड्यांच्या दुकानात ती काम करू शकते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.