(फोटो सौजन्य: instagram)
आपला अतिशहाणपणा आपल्याला कसा नडू शकतो याचे उत्तम उदाहरण सध्याच्या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून आले. तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्यास तुम्ही इथे अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहिले असतील मात्र सध्या इथे जो व्हिडिओ व्हायरल होत ते त्यातील दृश्ये पाहून तुम्ही हैराण व्हाल आणि डोक्यालाच हात लावाल. व्हिडिओत एक व्यक्ती नदीत आंघोळ करताना दिसतो. आपल्या अंगावर पाणी टाकत तो या दृश्यांचा व्हिडिओ बनवू पाहतो मात्र पुढच्याच क्षणी त्याच्यासोबत असे काही घडते की क्षणातच त्याला पाण्यातून बाहेर पडावे लागते. व्यक्तीची ही फजिती आता सोशल मीडियावर व्हायरल झाली असून लोक आता याची चांगलीच मजा लुटत आहेत.
सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही तुमच्या डोक्याला हात लावाल. यामध्ये नदीत आंघोळ करताना एका व्यक्तीसोबत धोकादायक घटना घडते ज्याने तोच काय सर्वच हादरून जातात. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तो माणूस आपल्या कॅमेरासह नदीत डुबकी मारण्याच्या तयारीत होता. त्याने पहिली डुबकी घेताच त्याला त्याचा पाय कोणीतरी खेचल्यासारखे वाटते. पाण्याखाली काय आहे हे पाहण्यासाठी तो ती गोष्ट हातात घेतो मात्र तिला पाहताच तो हादरतो आणि घाबरून बोटीच्या दिशेने पळू लागतो. खरं तर त्याने डुबकी मारताच त्याच्या पायाभोवती मगरी आढळते. हे पाहून तो माणूस घाब रतो आणि तो लगेच पाण्यातून पळून जवळच उभ्या असलेल्या बोटीवर जाऊन चढतो.
मगरीच्या अचानक झालेल्या हल्ल्याने ती व्यक्ती बेशुद्ध झाल्याचे तुम्हाला दिसेल. त्याच्या पायाभोवती काहीतरी गुंडाळले आहे हे लक्षात येताच तो घाबरतो आणि पटकन पाण्यातून उडी मारण्याचा प्रयत्न करतो. त्याची भीती आणि अस्वस्थता स्पष्टपणे दिसून येते. मगरीला पाहताच तो घाबरतो आणि क्षणाचाही विलंब न लावता बोटीत उडी मारून स्वतःला वाचवतो. व्यक्तीने वेळीच पळ काढत तिथून आपला जीव वाचवला अन्यथा क्षणाचाही विलंब त्याच्या जीवास धोकादायक ठरू शकला असता. मगर हा एक धोकादायक शिकार आहे अशात त्याच्या तावडीतून सुटणे काही सोपे नाही. हा व्हिडिओ सॅन डिएगो, कॅलिफोर्निया येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.
बापरे! जंगलातच लोकांनी कच्च्या अजगराला चावून खाल्लं, थरारक दृश्ये पाहून तुम्हीही हादराल; Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @rgstvh9 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक अवाक् झाले असून सोशल मीडियावर त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तरीही त्याच्या हिमतीची दाद द्यायला हवी” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भाऊ मृत्यूच्या दारातून पळून आला”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.