सौजन्य - नवराष्ट्र टीम
मे महिन्यात झाला होता प्राणघातक हल्ला
मे 2026 मध्ये परळी शहरात त्यांच्या मालकीच्या हॉटेलमध्ये एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने (कोयत्याने) जीवघेणा हल्ला केला होता. ज्यात ते गंभीर जखमी झाले होते. शिवाजी शिंदे हे आपल्या हॉटेलमध्ये थांबलेले असताना त्या ठिकाणी आलेल्या एका युवकाने हातात कोयता घेत त्यांच्यावर हल्ला चढवला. याच घटनेत शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. हॉटेलमधील इतर लोकांनी या युवकाला पकडून ठेवल्याने शिंदे यांचा जीव थोडक्यात वाचला होता. या हल्ल्यात शिवाजीराव शिंदे यांना गंभीर दुखापत झाली होती. यानंतर शिवाजी शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, सुरवसे नावाचा मुलगा आहे. त्याची माझी ओळख देखील नाही. मात्र, त्याचा आणि माझ्या मुलाचा काहीतरी वाद झाल्याचे समजले. त्याने माझ्या घरासमोर येऊन सर्वांदेखत शिवीगाळ केली. माझ्या हातापायावर अनेक वार करण्यात आले आहेत. माझ्या हॉटेलमधील पैसे लुटण्यात आले, असा आरोप त्यावेळी शिवाजीराव शिंदे यांनी केला होता.
त्यामुळे या घटनेचा आणि शिवाजीराव शिंदे यांच्या आत्महत्येचा काही संबंध आहे का, याची कुजबूज राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता पोलीस तपासात शिवाजीराव शिंदे यांच्या आत्महत्येबाबत कोणती माहिती समोर येणार, हे बघावे लागेल. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी ११ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. काही महिन्यांपूर्वीच जीवघेण्या हल्ल्यातून बचावलेल्या एका राजकीय नेत्याने अचानक अशा प्रकारे जीवन संपवल्याने अनेकांना धक्का बसला आहे. बीड पोलीस या प्रकरणी सर्व बाजूंनी तपास करत असून, आत्महत्येचे गूढ पोलीस तपासाअंतीच उलगडणार आहे.






