(फोटो सौजन्य: Twitter)
तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर तुम्ही इथे आजवर अनेक वेगवेगळे व्हिडिओ पाहिले असतील. हेर व्हिडिओज अनेकदा आपल्याला थक्क करतात, काही हसवतात तर काही भावुकही करतात. लोक इथे वाटेल त्या गोष्टी शेअर करू शकतात आणि यातील जे व्हिडिओ लोकांना आकर्षित करतात ते व्हायरल होतात. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्ये तुम्हाला आश्चर्याचा धक्का देतील. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक स्वप्नवत वाटणारी गोष्टी खऱ्या आयुष्यात घडताना दिसून आली. ही गोष्ट म्हणजे हवेत उडणारी कार.
तुम्ही अनेकदा कार हवेत उडाली तर… असा विचार केला असेल मात्र आता ही स्वप्नवत वाटणारी गोष्ट सत्यात उतरल्याचे दृश्य सध्या सोशल मीडियावर दिसून आले. अमेरिकेच्या अलेफ एरोनॉटिक्स कंपनीने हवेत उडू शकणारी कार बनवून सर्वांनाच चकित केले आहे. होय, आतापर्यंत आपण सर्वांनी उडत्या गाड्या फक्त चित्रपटांमध्येच पाहिल्या होत्या. पण या कंपनीने प्रत्यक्षात हे करून दाखवले आहे. या कारचा टेस्टिंग व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती अचानक रस्त्यावरून उडताना दिसत आहे आणि विशेष म्हणजे ही कार कोणत्याही रनवेशिवाय थेट वर येऊ शकते आणि हवेत उडू शकते.
कॅलिफोर्नियातील सुरक्षित आणि बंद रस्त्यावर या कारची टेस्टिंग करण्यात आली. व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे की, प्रथम ही कार एखाद्या सामान्य कारप्रमाणे रस्त्यावरून जात होती, नंतर अचानक ती वर आली आणि समोर उभ्या असलेल्या कारला मागे टाकत अवकाशात उडू लागली. ही अशी घटना जगात पहिल्यांदाच घडली असावी. भविष्यात ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी ही कार उत्तम पर्याय ठरू शकते, असा कंपनीचा दावा आहे. हा प्रकल्प विमान वाहतूक आणि वाहन उद्योगासाठी एक मोठी उपलब्धी मानली जात आहे.
बापरे! जंगलातच लोकांनी कच्च्या अजगराला चावून खाल्लं, थरारक दृश्ये पाहून तुम्हीही हादराल; Video Viral
कंपनीचे सीईओ जिम दुखोव्हनी यांनी या कारचे वर्णन जगातील पहिली उडणारी कार आहे, जी रस्त्यावर धावू शकते आणि हवेत उडू शकते. व्हिडिओमध्ये दाखवलेले मॉडेल एक प्रोटोटाइप आहे, ज्याला “अलेफ मॉडेल झिरो” म्हणतात. ट्रायल रननंतर कंपनी व्यावसायिक मॉडेल लाँच करण्याच्या तयारीत आहे. या कारमध्ये दोन लोकांसाठी बसण्याची व्यवस्था असेल असे सांगण्यात येत आहे. तसेच, त्याची फ्लाइंग रेंज 110 मैल असेल तर रस्त्यावर ड्रायव्हिंग रेंज 200 मैल असेल. ही कार ऑटोपायलट मोडवरही उडू शकते.
जर एखाद्याला ही कार खरेदी करायची असेल तर त्याला फक्त 13,000 रुपये बुकिंग रक्कम जमा करावी लागेल, असे सांगण्यात येत आहे. मात्र, या कारची अंदाजे किंमत 2.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते. आत्तापर्यंत Aleph कंपनीला 3,300 हून अधिक प्री-ऑर्डर मिळाल्या आहेत, ज्यावरून लोक या कारबद्दल खूप उत्सुक असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. ही कार ताशी 40 किमी वेगाने रस्त्यावर धावू शकते आणि गरज पडल्यास सरळ वर उडू शकते.
NEW: Alef Aeronautics releases footage of their electric car “jumping” over another car on a road in California.
The company claims this is the “first test in history of a car drive and vertical takeoff in a city.”
The company hopes to solve traffic by developing a car that can… pic.twitter.com/fjrFDIBlbK
— Collin Rugg (@CollinRugg) February 21, 2025
दरम्यान कारचा हा व्हायरल व्हिडिओ @CollinRugg नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर कारण्यात आला आहे. व्हिडिओतील उडत्या कारचे दृश्य पाहून सर्वच हादरले आणि यावर कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया मांडू लागले. एका युजरने लिहिले आहे, “ही एक भयानक कल्पना का दिसते?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हवाई वाहतूक ही आपल्यासाठी नवीन चिंता बनणार आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.