(फोटो सौजन्य: Pinterest)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात . सध्या मात्र इथे एक विचित्र आणि धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही लोक जंगलात पकडलेला अजगर कच्चा खाताना दिसून आले. हे दृश्य इतके भयाण होते की ते पाहून सर्वच हादरले. याचा व्हिडिओ आता वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत असून यातील दृश्ये तुमच्या पायाखालची जमीन हादरवतील. व्हिडिओत नक्की काय काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
ही घटना पापुआ न्यू गिनी येथील आहे, जिथे जंगलात राहणाऱ्या एका आदिवासी समुदायाने अजगराला पकडून त्याचे कच्चे मांस खाल्ले. साधारणपणे अजगराचे नाव ऐकताच लोक घाबरून पळून जातात, पण येथील दृश्य वेगळे होते. केवळ प्रौढच नाही तर लहान मुलंही यात अजगराला खाताना दिसून आली. हा व्हिडिओ आदिवासी समाजातील एका महिलेने स्वत: शेअर केला आहे, ज्यामध्ये आधी अजगराला मारण्यात आले, नंतर त्याचे तुकडे करून लोकांमध्ये वाटण्यात आले.
हा अजगर एवढा मोठा होता की अनेकांच्या हातात त्याचे मोठे तुकडे दिसत होते. सामान्यतः शिकारी समुदाय जंगलात शिकार केल्यानंतर ते शिजवून खातात, परंतु यावेळी लोकांनी ते कच्चे खाण्याचे ठरवले. हा व्हिडीओ व्हायरल होताच इंटरनेटवर त्याची बरीच चर्चा झाली. हा व्हिडीओ पाहून काही लोक आश्चर्यचकित झाले आहेत, तर काहींनी हा जंगलात राहणाऱ्या आदिवासींच्या परंपरेचा भाग असल्याचे मानले आहे. अनेक ठिकाणी लोक परंपरेने कच्चे मांस खातात, पण अजगराला न शिजवता खाण्याचा हा व्हिडिओ लोकांना अस्वस्थ करणारा आहे.
सर्वांना थक्क करणारा हा व्हिडिओ @sinceetthy नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘ज्यांना सापाचे मांस खायला आवडते त्यांनी येथे सामील व्हा’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत 3 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे तर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “त्यांच्यासाठी हे मुळा खाण्याबरोबर आहे, एका सॅलडप्रमाणे ते मांस चावत आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ओहएमजी”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.