Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमसे ना हो पायेगा! धबधब्याच्या काठावर उभा राहून गर्लफ्रेंडला प्रोपोज करत होता, तितक्यात पाय घसरला अन् स्वप्न झाले भंग; Video Vira

Flop Propose Video: आता भावाच्या परिस्थतीवर हसावं की रडावं! निसर्गाच्या सानिध्यात गर्लफ्रेंडला प्रपोज करू पाहत होता मात्र निसर्गाला ते मान्य झाले नाही आणि मग काय घडलं ते आता तुम्हीच पहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 07, 2025 | 08:57 AM
तुमसे ना हो पायेगा! धबधब्याच्या काठावर उभा राहून गर्लफ्रेंडला प्रोपोज करत होता, तितक्यात पाय घसरला अन् स्वप्न झाले भंग; Video Vira

तुमसे ना हो पायेगा! धबधब्याच्या काठावर उभा राहून गर्लफ्रेंडला प्रोपोज करत होता, तितक्यात पाय घसरला अन् स्वप्न झाले भंग; Video Vira

Follow Us
Follow Us:

सध्या पावसाळी वातावरणामुळे अनेक ठिकाणांचे सौंदर्य बहरून आले आहे, ज्यामुळे अनेकांचा या ऋतूमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन बनतो. यासहच अनेकजण या सुंदर वातावरणाचा फायदा घेत आपल्या प्रेयसीला प्रोपोज करण्याचा प्लॅन करतात. सुंदर वातावरण आणि बहरून आलेलं ठिकाण त्यांच्या प्रोपोज प्लॅनसाठी सर्वोत्तम ठरतो. मात्र निसर्ग जितका सुंदर आहे तितकाच तो क्रूरही आहे. इथे कधी काय घडेल याची शाश्वती नाही आणि असाच एक प्रकार एका तरुणासोबत घडून आल्याचे नुकतेच दिसून आले आहे. वास्तविक तरुण धबधब्याच्या काठावर आपल्या प्रेयसीला प्रोपोज करण्याचा प्लॅन करत होता मात्र निसार्ह त्याला असे करण्यापासून रोखतो आणि पुढे काय घडते ते चला सविस्तर जाणून घेऊया.

स्वतःचं सुटेना अन् दुसऱ्याला…! रशियन बॉक्सरने मर्यादा ओलांडल्या, पिंजऱ्याबाहेर जाऊन माकडासोबत ओढली ई-सिगारेट; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात दिसून येते की, एक तरुण धबधब्याच्या मध्यभागी खडकाच्या काठावर उभा आहे. यावेळी त्याची प्रेयसी त्याच्यासमोर पाठ करून उभी आहे. मुलगी निसर्गाचे बारकाईने पाहत असते आणि याचवेळी मुलगा तिला हात लावून आपल्याकडे पाहायला सांगतो. मुलगी जशी वळते तो गुढघ्यावर बसून मुलीला प्रोपोज करू पाहतो मात्र निसर्गाला हे मान्य नसते. मुलगा गुढघ्यावर बसणार तितक्यात पाण्याचा प्रवास त्याला आपल्यासोबत घेऊन जातो आणि तो धबधब्यावरून खाली पडतो. प्रेयसीला काही समजेल त्याआधीच मुलगा प्रवाहात वाहून जातो आणि त्याच्या प्रोपोजचे स्वप्न स्वप्नच बनून राहते. हा व्हिडिओ नक्की कुठला आहे आणि यात पुढे काय घडले हे व्हिडिओत स्पष्ट करण्यात आले नाही.

A dude pops the question to his girl in a crazy dangerous spot…🥺 💔 pic.twitter.com/Gzdxfza5hD — March (@MarchUnofficial) July 4, 2025

पांचट Jokes : बंटी पिंटूला विचारतो… तुला माहिती आहे का मंदिरात फक्त पुरुष पुजारीच का असतात? उत्तर वाचाल तर खळखळून हसाल

दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @MarchUnofficial नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे हास्यास्पद आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला वाटत नाही की अशा गोष्टींची काही गरज आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अशा घटनांनंतरही लोक धडा घेत नाहीत. सर्वांना वाटते की हे माझ्यासोबत होऊ शकत नाही”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Man was standing on the edge of a waterfall and proposing to his girlfriend but suddenly his feet slipped and see what happned next viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2025 | 08:57 AM

Topics:  

  • Monsoon
  • Propose day
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

पावसाळ्यात सफाई मित्रांच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार; पांचगणी नगरपरिषद व हिलदारीचा मान्सूनपूर्व उपक्रम
1

पावसाळ्यात सफाई मित्रांच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार; पांचगणी नगरपरिषद व हिलदारीचा मान्सूनपूर्व उपक्रम

How To Kill Man? मेट्रोत पुस्तक उघडलं अन् प्रवाशांचे डोळेच विस्फारले! टायटल पाहून पुरुषांची उडाली झोप
2

How To Kill Man? मेट्रोत पुस्तक उघडलं अन् प्रवाशांचे डोळेच विस्फारले! टायटल पाहून पुरुषांची उडाली झोप

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे
3

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे

रिल बनवण्याचं हे कसलं वेड! पावसात व्हिडिओ शूट करत होती तरुणी; मागून भरधाव बस आली अन्…, Video Viral
4

रिल बनवण्याचं हे कसलं वेड! पावसात व्हिडिओ शूट करत होती तरुणी; मागून भरधाव बस आली अन्…, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.