(फोटो सौजन्य: X)
काय दिसलं व्हिडिओत?
वेगाने इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, घनदाट जंगलाच्या मध्यभागी एक तरुण झाडांवर उडी मारतो त्या चपळाईने लोक आश्चर्यचकित होतात. व्हिडिओची सुरुवात हिरव्यागार जंगलाच्या दृश्याने होते. आजूबाजूला उंच झाडे दिसतात. नंतर कॅमेरा वर जातो आणि एक तरुण झाडाच्या उंच फांदीवर उभा असलेला दिसतो. सुरुवातीला, तो काय करणार आहे हे समजणे कठीण आहे, परंतु दुसऱ्याच क्षणी, तो एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारताना दिसतो. नंतर तो न थांबता एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारत राहतो. त्याचा वेग आणि संतुलनामुळे असे दिसते की त्याला उंचीची भीती वाटत नाही. तो प्रत्येक उडी काळजीपूर्वक विचार करुन घेतो. त्याच्या चेहऱ्यावर आपल्याला आत्मविश्वास स्पष्ट दिसून येतो. असे दिसते की तो बराच काळ याचा सराव करत आहे. व्हिडिओच्या शेवटी तो जंगलाच्या टोकावर असलेल्या एका खडकावर उडी घेत उभा असल्याचे दिसते, जिथून समुद्राचे सुंदर दृष्य दिसू लागते.
Parkour on a tree 📹Anthony Denis
pic.twitter.com/BwF7kVzgBd — Science girl (@sciencegirl) February 28, 2026
अनेक यूजर्सने तरुणीच्या या स्टंटबाजीवर प्रतिक्रिया देत त्याला मोगलीची उपमा दिली आहे तर काहींनी हे धोकादायक असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडिओ @sciencegirl नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “माणूस हे करण्यासाठी जन्माला आलेला नाही, पण धडा म्हणजे भीती नाही आणि सराव तुम्हाला अशा गोष्टी करण्यास मदत करू शकतो” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हा अॅक्शन चित्रपटातील सीन वाटत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “या माणसाला क्लासिक टार्झन चित्रपट खरोखरच फार आवडत असावा”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






