
Navratri 2025 kids playing garba in unique style video goes viral
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स तुम्ही अनेक गरबा खेळतानाचे व्हिडिओ (Video) पाहिले असतील. सध्या असाच एक काही चिमुकल्यांचा गरबा खेळतानाचा भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका गुजराती गाण्यावर एक चिमुकला गरबा खेळत आहे, अशी स्टेप्स तर मोठ्यांना देखील जमणार नाहीत असे नृत्य चिमुकला करत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर चिमुकल्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील चिमुकल्यांचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.
IND vs PAK : आशिया कप हारताच पाकिस्तानची उडाली खिल्ली; सोशल मीडियावर Memes चा पाऊस
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @the_dancekingdom या अकाउंटवर शेअक करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्श्नमध्ये जेव्हा गरबा तुमचा जीव असतो आणि बॉलीवूड तुमचा प्राण असतो तेव्हा… असे लिहिले आहे. तसेच या व्हिडिओच्या पीओव्ही(POV) म्हणजे पाइंट ऑफ व्ह्यू- द गुगल स्टेप्स असे लिहिले आहे. अनेकांनी चिमुकल्यांचे भरभरुन कौतुक केल आहे. सर्वांनी याला एकच नंबर स्टेप्स म्हटले आहे. एका युजरने हा नक्कीच अक्षय कुमार बनणार असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने ओह हो स्वॅग… असे म्हटले आहे. तिसऱ्या एका नेटकऱ्याने भाऊ मी तर याच्याकडून गरब्याचे क्लास घेणार पुढच्या वेळी असे म्हटले आहे. अशा पद्धतीने अनेकांनी चिमुकल्याचे भरभरुन कौतुक केले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.