Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nepal Flood Viral House: महापुराचा कहर, पण ‘हे’ घर ठाम! आजूबाजूचं सगळं वाहून गेलं तरी घराला धक्का नाही; VIDEO व्हायरल

Nepal Flood Viral House: नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागांत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुराच्या रौद्र प्रवाहातही एक हिरवं घर सुरक्षित राहिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये आजूबाजूचा परिसर पुराच्या पाण्यात वाहून जाताना दिसत असताना घर मात्र जागच्या जागी उभं असल्याचं दिसतं.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 31, 2026 | 11:19 AM
Nepal Flood Viral House: महापुराचा कहर, पण 'हे' घर ठाम! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Nepal Flood Viral House: महापुराचा कहर, पण 'हे' घर ठाम! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • नेपाळच्या महापुरातील घराचा VIDEO व्हायरल
  • घरात १८ जण असल्याचा दावा; सर्वजण सुखरूप
  • मजबूत बांधकाम की दैवी चमत्कार? नेटकऱ्यांमध्ये चर्चा
Nepal Flood Viral Video: नेपाळमध्ये सध्या पावसाने अक्षरशः थैमान घातलंय. सगळीकडे फक्त पाणीच पाणी दिसत आहे. प्रसारमाध्यम सुरु केली की महापुराचा हाहा:कार पाहायला मिळतोय. नद्यांना आलेल्या प्रचंड पुरामुळे जनजीवन पुर्णपणे कोलमडून गेलं. पाण्याचा जोर इतका जास्त आहे की मोठमोठी घरं, बिल्डिंग सुद्धा कागदासारखी वाहून जात आहेत. लाखो किमतीच्या गाड्या पाण्यावर काडीसारख्या तरंगताना दिसताहेत.या नैसर्गिक संकटात आतापर्यंत खूप मोठी हानी झाली आहे. सर्व बातम्यामध्ये एका घराचा उल्लेख अगदी जोरदार होत असून सोशलमीडियावर फक्त याच घरांची चर्चा सुरु आहे. Nepal Flood Viral House:

सोशलमीडियावर घराची चर्चा

त्या घराला पुराच्या पाण्याचा जराही धक्का लागला नाही. याचा एक व्हिडीओ आता इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय, आजूबाजूला पुराचं रौद्र रूप पाहायला मिळतयं. पाणी अगदी वेगाने वाहताना. सगळं काही सोबत घेऊन जातंय. पण मधोमध असलेलं ते हिरवं घर मात्र शांत उभं आहे. घराच्या बाल्कनीत तीन-चार लोक उभे राहून हा सगळा पूर पाहत आहेत. सांगितलं जातंय की त्या घरात तेव्हा १८ लोक होते आणि सुदैवाने सगळे सुखरूप आहेत. या घराने खऱ्या अर्थाने त्यांना वाचवलं.आता हाच व्हिडीओ पाहून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. कुणी म्हणतंय हा देवाचाच चमत्कार आहे. तर कुणी म्हणतंय या घराचा पाया इतका मजबूत बनवला आहे की पुराचं पाणी सुद्धा त्याला हलवू शकलं नाही.सगळ्यात जास्त चर्चा आहे ती या घराला बांधणाऱ्या कारागिराची आहे.

घराचा कारागिर कोण?

लोक कमेंट करून म्हणत आहेत की ज्या इंजिनिअरने हे घर बांधलंय, त्याला खरंच एखादा मोठा पुरस्कार द्यायला हवा. त्याने कोणतं साहित्य वापरलं, कोणतं सिमेंट लावलं, पाया कसा भरला, याबद्दल सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.खरंच, आजकाल पैसे वाचवण्यासाठी अनेक ठिकाणी बांधकामात हलगर्जीपणा केला जातो. पण हे घर बघून कळतं की प्रामाणिकपणे आणि मजबूत बांधकाम केलं तर ते किती महत्त्वाचं ठरू शकतं. संकटाच्या वेळी तेच बांधकाम जीव वाचवतं.तुम्ही हा व्हिडीओ पाहिला का? तुम्हाला काय वाटतं, हे नशीब आहे की चांगल्या बांधकामाची कमाल?

The House in Green which survived against all Odds. Even the brutal wrath of Nature which destroyed everything in its path couldn’t shake it’s foundation.#Nepal #NepalDisaster pic.twitter.com/sgVRF57jsW — D (@Deb_livnletliv) August 28, 2026

600 पेक्षा अधिक लोकांचा जीव गमावलेला…

मिळालेल्या बातम्यांनुसार ६०० पेक्षा जास्त लोकांनी आपला जीव गमावलाय. तर दोन हजारांहून अधिक जण अजूनही सापडले नाहीयेत. या बेपत्ता लोकांमध्ये ३२० भारतीय सुद्धा आहेत असं सांगितलं जातंय. म्हणजे परिस्थिती किती गंभीर आहे याचा तुम्ही विचार करा.पण या सगळ्या वाईट बातम्यांमध्ये एक गोष्ट मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. आणि ती म्हणजे एक छोटंसं हिरव्या रंगाचं घर. जिकडे बघावं तिकडे सगळं काही पाण्याखाली गेलं असताना, आजूबाजूच्या इमारती डोळ्यादेखत पडत असताना, हे दोन मजली हिरवं घर मात्र अगदी ठामपणे उभं आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Nepal flood viral video house remains unharmed amid devastating floodwaters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 11:19 AM

Topics:  

  • Marathi News
  • navarshtra news
  • Nepal Flood
  • viral video

संबंधित बातम्या

US-China Trade : ट्रम्प-शी भेटीनंतर चीनची अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी; ८ ते १० कार्गोंचे व्यवहार
1

US-China Trade : ट्रम्प-शी भेटीनंतर चीनची अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी; ८ ते १० कार्गोंचे व्यवहार

Social Media Controversy : अमेरिकेच्या नेव्ही डे पोस्टमध्ये भारतीय नौदलाचे फोटो; सोशल मीडियावर चर्चा
2

Social Media Controversy : अमेरिकेच्या नेव्ही डे पोस्टमध्ये भारतीय नौदलाचे फोटो; सोशल मीडियावर चर्चा

Pakistan Violence : गव्हर्नर राजवटीवरून पाकिस्तानमध्ये संघर्ष; पोलिसांच्या गोळीबारात पाच जण जखमी
3

Pakistan Violence : गव्हर्नर राजवटीवरून पाकिस्तानमध्ये संघर्ष; पोलिसांच्या गोळीबारात पाच जण जखमी

Inspirational Story : दिव्यांगांच्या हक्कांसाठी लढा; सुगमतेच्या माध्यमातून निलेश सिंगित यांचा प्रेरणादायी प्रवास
4

Inspirational Story : दिव्यांगांच्या हक्कांसाठी लढा; सुगमतेच्या माध्यमातून निलेश सिंगित यांचा प्रेरणादायी प्रवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.