Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अबब! ऑनलाईन खरेदी पडली महागात, 5 ग्रॅमचं सोनं ऑर्डर केलं पण डिलिव्हर झालं 1 रुपयाचं नाणं; Video Viral

Shocking Viral Video : ऑनलाईन शॉपिंगचा धक्कादायक प्रकार समोर...! तरुणाने स्विगी इंस्टमार्टवरून ५ ग्रामचे नाणे ऑर्डर केले होते पण बदल्यात त्याला असे काही मिळाले जे पाहून रायडरही घाबरला.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 25, 2025 | 02:38 PM
अबब! ऑनलाईन खरेदी पडली महागात, 5 ग्रॅमचं सोनं ऑर्डर केलं पण डिलिव्हर झालं 1 रुपयाचं नाणं; Video Viral

अबब! ऑनलाईन खरेदी पडली महागात, 5 ग्रॅमचं सोनं ऑर्डर केलं पण डिलिव्हर झालं 1 रुपयाचं नाणं; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • इन्स्टामार्टवरून 5 ग्रॅम सोन्याचे नाणे ऑर्डर केलेल्या ग्राहकाला डिलिव्हरीमध्ये चक्क 1 रुपयाचे नाणे मिळाले.
  • या घटनेचा व्हिडिओ त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे जो वेगाने व्हायरल होत आहे.
  • या घटनेनंतर युजर्सकडून ऑनलाईन गोल्ड खरेदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
जेवण असो वा कोणती गरजेची वस्तू आजकाल लोक सर्वच काही ऑनलाईन मागवू लागले आहेत. घराबाहेर पडण्याचा कंटाळा करत आपण ऑनलाईन वस्तू मागवतो खरं पण तुम्हाला माहिती आहे का? तुमची ही सवय तुम्हाला महागातही पडू शकते. ऑनलाईन फ्रॉडची एक नवीन घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामध्ये, ५ ग्रॅम सोन्याच्या नाण्याऐवजी, एका ग्राहकाला एक रुपयाचे नाणे मिळाल्याचे उघड झाले आहे. अंकित दिवाण या युजरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याच्यासोबत झालेल्या एका फसवणुकीविषयी शेअर केले. वास्तविक, अंकितने स्विगी इन्स्टामार्टवरून ५ ग्रॅम सोन्याचे नाणे ऑर्डर केले होते, परंतु त्याला या सोन्याच्या नाण्याऐवजी एक रुपयाचे नाणे डिलिव्हर झाले. चला या संपूर्ण प्रकरणाविषयी सविस्तर जाणून घेऊया.

वाह रे मुंबई! रिक्षाच्या छतावर श्वान, खाली ट्रॅफिक… प्राण्याची अनोखी राईड पाहून युजर्स झाले खुश; Video Viral

फसवणुकीविषयी सांगताना अंकितने म्हटले की, त्याने स्विगी इन्स्टामार्ट वरून ५ ग्रॅम सोन्याचे नाणे ऑर्डर केले होते, परंतु डिलिव्हरीमध्ये त्याला १ रुपयांचे नाणे मिळाले. तथापि, कंपनीने ताबडतोब ऑर्डर रद्द केली आणि त्याला त्याचे पैसे परत मिळाले, परंतु डिलिव्हरी पार्टनर खूप नाराज झाला. त्याने डिलिव्हरी व्यक्तीला पार्सल उघडण्यास सांगितले आणि त्याचा व्हिडिओ बनवला. त्याने एक्स वर व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. अंकितने लोकांना सावधगिरी बाळगण्याचा आणि पॅकेट तपासल्याशिवाय ओटीपी देऊ नये असा सल्ला दिला आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, व्यक्ती पॅकेट खोलून आपलं पार्सल ओपन करताना दिसून येतो. पार्सल पूर्णपणे पॅक केलेले असते पण जेव्हा यातून खरी गोष्ट बाहेर येते तेव्हा ग्राहकांसह रायडरलाही धक्का बसतो. आतील पॅकेट उघडताच यातून सोन्याचं नाही तर १ रुपयांचं नाणं बाहेर पडतं. आपली चुकीची डिलिव्हरी पाहताच ग्राहकाला धक्का बसतो पण सुदैवाने कंपनी त्याला रिफंड करते. तुमच्यासोबतही अशी घटना होऊ नये असे वाटत असल्यास ऑनलाईन शॉपिंग करताना थोडी सावधानता बाळगा. तुमचे एक चुकीचे पाऊल तुमचे मोठे नुकसान करू शकते.

Just got a 1 rupee coin instead of 5g Gold Coin from @SwiggyInstamart . While the order has been cancelled, and I have got my money back, the delivery partner was ready to cry. The whole opening was captured on a video. I hope they are fair with the partner. Please be careful… pic.twitter.com/iYYHtvsy0k — Ankit Dewan (@ankitdewan) December 9, 2025

गाडी गेली, पण जबाबदारी थांबली नाही! झोमॅटो रायडरने चालत जाऊन केली ग्राहकाची ऑर्डर डिलिव्हर; Video Viral

हा व्हिडिओ @ankitdewan नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ते बावळट लोक आहेत जे ऑनलाईन गोल्ड विकत घेतात, सोन्यासारखी वस्तू दुकानात जाऊन खरेदी करायला हवी” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “माझा फक्त १ प्रश्न आहे. का? इंस्टामार्ट वरून टोमॅटो / कांदा ऑर्डर करणे समजण्यासारखे आहे, ५ ग्रॅम सोने का? ते ते २ किंवा ३ ग्रॅमच्या किमतीत देत होते का?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मला अजूनही ऑनलाईन गोष्टी मागवायला भीती वाटते”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Online fraud video viral man received 1rs coin instead of gold coin viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 02:38 PM

Topics:  

  • Gold
  • scam
  • shocking viral news
  • viral video

संबंधित बातम्या

थोडक्यात अनर्थ टळला! बंद लिफ्टच्या खड्ड्यामध्ये चिमुकलीचा तोल जाणार इतक्यात…; वॉचमॅन बनला देवदूत, Video Viral
1

थोडक्यात अनर्थ टळला! बंद लिफ्टच्या खड्ड्यामध्ये चिमुकलीचा तोल जाणार इतक्यात…; वॉचमॅन बनला देवदूत, Video Viral

वाह रे मुंबई! रिक्षाच्या छतावर श्वान, खाली ट्रॅफिक… प्राण्याची अनोखी राईड पाहून युजर्स झाले खुश; Video Viral
2

वाह रे मुंबई! रिक्षाच्या छतावर श्वान, खाली ट्रॅफिक… प्राण्याची अनोखी राईड पाहून युजर्स झाले खुश; Video Viral

गाडी गेली, पण जबाबदारी थांबली नाही! झोमॅटो रायडरने चालत जाऊन केली ग्राहकाची ऑर्डर डिलिव्हर; Video Viral
3

गाडी गेली, पण जबाबदारी थांबली नाही! झोमॅटो रायडरने चालत जाऊन केली ग्राहकाची ऑर्डर डिलिव्हर; Video Viral

Viransh Bhanushali: ‘निर्लज्ज देश!’ ऑक्सफर्ड युनियनमध्ये भारताचा सिंह गरजला; पाकिस्तानला दाखवली लायकी, VIDEO VIRAL
4

Viransh Bhanushali: ‘निर्लज्ज देश!’ ऑक्सफर्ड युनियनमध्ये भारताचा सिंह गरजला; पाकिस्तानला दाखवली लायकी, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.