Pakistan Super League viral video player get hairdryer as man of the match video goes viral
पाकिस्तानमध्येही इंडियन प्रीमीयर लीग (IPL) प्रमाणेच पाकिस्तानमध्येही पाकिस्तान सुपर लीग सुरु आहे. पाकिस्तानने नेहमीप्रमाणे यामध्येही आपल्या गरीबीचं प्रदर्शन केले आहे. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरुन पाकिस्ताच्या PSL वर टीकांचा वर्षाव होत आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानच्या सुपर लीग मध्ये शतक मारणाऱ्या खेळाडूला असे काही गिफ्ट दिले आहे की यामुळे सर्वत्र पाकिस्तान क्रिकेटची चव्हाट्यावर मारली असे म्हटले जात आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, पाकिस्तानच्या सुपर लीग मध्ये एका खेळाडू शकत झळकवले आहे. या खेळाडूला सामनावीर पुरस्कार म्हणून चक्क हेअर ड्रायर देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी झालेल्या पाकिस्तीन सुपर लीगमध्ये कराची किंग विरुद्ध मुलतान सुलतान्स यांच्यात सामना झाला. या सामन्यादरम्यान कराची किंग चार विकेट्स राखून मुलतान सुलतान टीमचा पराभव केला. या सामन्यात मुलता सुलतानन्सने प्रथम फलंदाजी केली. त्यांनी कराची किंग्जसाठी 234 धावांचे लक्ष्य ठेवले. दरम्यान लक्ष्याचा पाठलाग करत करा किंग्जच्या जेम्ल व्हिन्सने 43 चेंडूत 101 धावा काढल्या आणि संघाला विजय मिळवून दिला.
या सामन्यानंतर कराची किंग्जकडून जेम्स व्हेन्सला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे या पुरस्कारात खेळाडूला भेटवस्तू म्हणून हेअर ड्रायर देण्यात आले. यामुळे खेळांडूमध्ये हशा पिकला. तसेच जेम्स व्हेन्सने म्हटले की, “आव्हानं कठीण होतं, पण मैदान फलंदाजीसाठी उत्तम होतं, यामुळे बॅटिंग करणं सोपं गेलं.” दोन्ही संघाच्या इतर खेळाडूंनीही चांगली खेळी खेळली. दरम्यान याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
PSL player of the game gets ladies hair dryer 😱😱
ये है इन भिखारियों की औकात और ये कश्मीर लेना चाहते थे 😂😂😂😂#Pakistan #PSL2025 #PSL #TATAIPL #RRvRCB #MIvDC #DCvMI
pic.twitter.com/zr6PoAx6h0— Singh’am (@UniversalXtweet) April 13, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @UniversalXtweet या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “ही स्थिती आहे या भिकाऱ्यांची आणि यांना कश्मीर हवा आहे.” सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.