अरे जरा तरी लाज वाटू द्या! हे ड्रोन नाही तर वीज आहे... पाकिस्तानी पोलिसांचा खोटा दावा नागरिकाने केला उघड; Video Viral
भारत पाकिस्तान युद्धाचे बिगुल वाजले असून जगभरात याचे पडसाद पडल्याचे दिसून येत आहे. या युद्धात आता दोन्ही देशांची पुढची भूमिका काय असणार यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. यासंबंधित अनेक व्हिडिओज आणि फोटोज देखील सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. याच पार्शभूमीवर भारताचा शेजारील देश पाकिस्तानमधील एक धक्कादायक व्हिडिओ नुकताच इंटरनेटवर व्हायरल झाला आहे, ज्यात पाकिस्तानने पुन्हा आपली लाज काढल्याचे स्पष्ट होत आहे.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर सतत हल्ले करत आहे. भारत ड्रोनद्वारे पाकिस्तानवर सतत हल्ले करत आहे. या क्रमाने भारताने रावळपिंडीलाही लक्ष्य केले आहे. भारताच्या हल्ल्यात रावळपिंडी स्टेडियम उद्ध्वस्त झाले. हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक पाकिस्तानी तरुण रावळपिंडी स्टेडियमवरील हल्ल्याचा व्हिडिओ कॅमेऱ्याद्वारे कैद करत आहे आणि लोकांना दाखवत आहे.
व्हिडिओमध्ये, तरुणाने या हल्ल्याचा उल्लेख करताना म्हटले आहे की, सध्या रावळपिंडीमध्ये हलका पाऊस पडत आहे आणि पाकिस्तान पोलिस रावळपिंडीवरील भारतीय ड्रोन हल्ल्याला वीज पडणे म्हणत आहेत. हल्ल्यानंतर तो रावळपिंडी स्टेडियममध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता पण पोलिसांनी त्याला रोखल्याचे तरुणाने सांगितले. जेव्हा त्याने याचे कारण पोलिसांना विचारले तेव्हा त्यांनी हा हल्ला नसून वीज पडल्याचा खोटा दावा केला. व्हिडिओमध्ये, तो तरुण पाकिस्तानी पोलिसांवर आपला राग व्यक्त करतो आणि म्हणतो की, त्यांना भारतीय हल्ल्याला वीज म्हणून संबोधण्याची लाजही वाटत नाही. आपले पोलिस अक्षम आणि अज्ञानी आहेत. व्हिडिओमध्ये तरुण म्हणत आहे की, भारताने रावळपिंडीवर केलेल्या हल्ल्यामुळे लोक घाबरले आहेत.
Pakistan army is trying to report and block this video
Please save it for future purposes.
All top military officers of Pakistan are underground
🇮🇳🚀🔥
— Akshit Singh 🇮🇳 (@IndianSinghh) May 8, 2025
तरुणाचा हा व्हिडिओ @IndianSinghh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला मिलियनमध्ये व्युज मिळाले असून अजूनही हा व्हिडिओ वेगाने शेअर केला जात आहे. व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी त्यावर कमेंट करायला सुरुवात केली. अनेक युजर्सने आता पाकिस्तानी सैन्य आणि त्यांच्या पोलिसांची खिल्ली उडवायलाही सुरुवात केली आहे. तर काहींनी भारताच्या कृतीचे समर्थन केले आहे. एका युजरने कमेंट्समध्ये लिहिले आहे की, “अव्सकाशातून अजून बरीच वीज पडणे बाकी आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ड्रोनचे दुसरे नाव मला आता समजले… आकाशातील वीज”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.