(फोटो सौजन्य – Instagram)
प्रेम ही जगातली सर्वात सुंदर भावना मानली जाते. आयुष्यात एकदा तरी व्यक्ती कुणावर ना कुणावर प्रेम हा करतोच. दरवर्षी प्रेमावर आधारित अनेक चित्रपट, आणि वेब सिरीज प्रदर्शित होतात, ज्यांना मोठ्या प्रमाणात लोकांची पसंती मिळते. प्रेमाची अनेक उदाहरणेही दिली जातात जी आजही लोकांच्या मनात अमर आहेत. तुम्ही लैला-मजनू, रोमियो-ज्युलिएट अशा अनेक जोडप्यांच्या प्रेमकथा ऐकल्या असतील मात्र तुम्हाला माहिती आहे का? प्रेमाची भावना फक्त माणसांमध्येच नाही तर प्राण्यांमध्येही असते. आपले एखाद्यावर प्रेम आहे हे सांगण्यासाठी किंवा आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी लोक प्रपोजचा पर्याय निवडतात. असेच एका हत्तीचे प्रोपोजल सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहे.
सोशल मीडियावर सध्या एक सुंदर आणि कधीही न पाहिलेले असे दृश्य व्हायरल झाले आहे ज्यात एक हत्ती दुसऱ्या हत्तीणीला आपल्या प्रेमाची कबुली देताना दिसून आला. जो हत्ती नेहमी सोंडेत ऊस किंवा केळी धरून असतो यावेळी तो सोंडेत पुष्पगुच्छ धरून उभा दिसला. एवढेच काय तर पुढे हत्ती अक्षरशः फिल्मी अंदाजात हत्तीणीला प्रपोज करताना दिसतो, जे पाहून सर्वांचे डोळे खुलेच्या खुलेच राहतात. लोक हे दृश्य पाहून हादरले असून अनेकजण या दृश्यांनी भारावून गेले. हत्तीचे हे सुंदर प्रपोजल सर्वांनाच फार आवडले आणि लोक हा व्हिडिओ वेगाने शेअर करू लागले.
व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एक हत्ती आपल्या सोंडेत पुष्पगुच्छ धरून आहे हत्तीणीजवळ जातो. हत्तिणी हे पाहून खुश होते आणि लगेच तो पुष्पगुच्छ आपल्या सोंडेत पकडते. यानंतर हत्तिणी आपले गुढघे टेकवते जे पाहून असे वाटते की ती जणू थँक यू बोलत आहे. यानंतर हत्तीही आपले गुढघे टेकवतो आणि हे सुंदर दृश्य कॅमेरात कैद केले जाते.
हा सुंदर व्हायरल व्हिडिओ @idiotic_sperm नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून हजारो लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जात एकच आहे, त्यांच्या कुटुंबांना कोणतीही अडचण येणार नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “व्वा, प्राण्यांनाही हे हावभाव समजतात”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.