Marathi Jokes : अरे, जरा हस की भावा! रोजच्या धाकधुकीच्या जीवनातून थोडा वेळ स्वत:च्या मनोरंजनासाठी काढा आणि वाचा मराठी विनोद. हे विनोद तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू आणतील.
पांचट जोक्स
Follow Us:
Follow Us:
विस्तार
दोन मित्र फोनवर बोलत असतात.
पहिला – Hello भाई काय करतोस…?
दुसरा – मस्तरे एकदम, काय म्हणतोस….?
पहिला – अरे काय नाय, जरा काम होतं.
दुसरा – हा ठिक आहे मग तू काम करुन घे आपण नंतर निवांत बोलू.
गण्या मुलीला म्हणाला, जीना सिर्फ मेरे लिए!
मुलगी म्हणाली, “ठीक आहे मी ‘लिफ्ट’ ने जाते, तू ये जिन्याने!”
एक प्रेग्नंट बाई पुरुष डॉक्टरकडे जाते…
डॉक्टर : काय बाई, कितवा महिना?
बाई (लाजून) : इश्य!, आठवा
डॉक्टर (आणखी लाजून) : अहो, मी कसा आठवू? तुम्हीच आठवा!
गुरुजी : बाळू सांग, तुझ्या बाबांकडे १० रुपये आहेत, तु त्यातले ५ रुपये मागितले,
तर त्यांच्याकडे किती रुपये शिल्लक राहतील ?
बाळू : सर, १० रुपये.
गुरुजी : बाळू तुझं गणित फार कच्च आहे रे?
बाळू : नाही सर, तुम्ही माझ्या बाबांना ओळखत नाही.
बंड्याः आय लव्ह यू…
पोरीने बंड्याच्या खाडकन कानाखाली दिली आणि म्हणाली “काय बोललास”
मग लगेच बंड्यानेही पोरीच्या दोन कानाखाली दिल्या आणि म्हणाला…
“ऐकूच आलं नाही, तर मग मारलस कशाला??”
Web Title: Panchat jokes bandya proposal girl funny reply marathi jokes