(फोटो सौजन्य: Instagram)
इंस्टाग्राम यूजर आणि ट्रॅव्हलर @aesthetetraveller या क्रिएटरने घटनेचा व्हिडिओ शेअर करत त्यांच्यासोबत घडलेला प्रकार सोशल मिडियावर शेअर केला. त्याने रेल्वेच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करत प्रवासी रेल्वेत खरंच सुरक्षित आहेत हा? असा सवाल केला. क्रिएटरने सांगितले की, यावेळी त्यांच्या आजूबाजूला इतर कुटुंबिय आणि काही लहान मुलेही प्रवास करत होती. दगड खिडकीला आदळल्याने कोणत्या प्रवाशाला फारशी दुखापत झाली नाही परंतु त्याचे मित्र यात किरकोळ जखमी झाले. रात्री जेवणाचा आस्वाद घेत असताना रेल्वेत ही घटना घडली. या घटनेमुळे खिडकीचा चुराडा होऊन यात एक मोठे छिद्र पडल्याचे दिसते.
View this post on Instagram
बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral
व्हिडिओच्या शेवटी ट्रेनच्या बाहेरील भाग दाखवण्यात येतो ज्यात पोलीस अधिकारी घटनास्थळाची तपासणी करत असतात. व्हिडिओ शेअर करताना क्रिएटरने आपला अनुभव शेअर करत रेल्वेतील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा निर्दशनास आणला. या घटनेमुळे आता सोशल मिडियावर चर्चेला उधाण आले आहे. अनेक यूजर्सने व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करत सदर घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “आपल्याला ट्रेनच्या खिडक्यांच्या बाहेर डॅशकॅम लावण्याची गरज आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मुंबई एक्सप्रेसमध्ये माझ्यासोबतही अशीच घटना घडली होती”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “बापरे काय हे किती भयंकर प्रवास सुरक्षित नाहीच”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.






