(फोटो सौजन्य: Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
इंटरनेटवर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पनवेल रेल्वे स्थानकावरील असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये आपण पाहू शकता की, रेल्वे ट्रॅकवर एक ट्रेन उभी असून काही लोक ट्रेनच्या बाजूला अक्षरश: अर्धनग्न होऊन आंघोळीचा आनंद घेत आहेत. मुख्य म्हणजे बाजूलाच स्थानकावर लोकांची वर्दळ असताना हे कृत्य करणे म्हणजे लाजेलाच विसरण्यासारखे आहे. ही आंघोळ कुणी एक किंवा दोन माणसं करत नव्हती तर माणसांचा मोठा जमाव एकत्रितपणे रेल्वे ट्रॅकवर आंघोळीची मजा लुटत होता. त्यांच्या या आंघोळीने फक्त आजूबाजूच्या लोकांनाच नाही तर यूजर्सनाही थक्क केलं. अनेक प्रवाशांनी थांबून हे दृष्य पाहिलं तर काहींनी आपल्या फोनच्या कॅमेरात या अनोख्या नजाऱ्याला कैद केलं. इंटरनेटवर आता हा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरत असून आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सार्वजनिक ठिकाणी असे वर्तन करणे योग्य नाही. अशा प्रकारच्या कृतींमुळे केवळ स्वतःचीच नाही तर इतरांचीही गैरसोय होते, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वागताना जबाबदारीची जाणीव ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.
व्हिडिओला लोकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला असून वेगवेगळ्या सोशल मिडिया प्लॅटफाॅर्म्सवर याला शेअर केले जात आहे. अनेक यूजर्स कमेंट्स करत व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत देखील व्यक्त केले आहे. काहींनी ही लोक उत्तर प्रदेशमधून आली असल्याचे म्हटले तर काहींनी बदलत्या काळात लोकांनी लाजही विसरली असल्याचे म्हटले. एका युजरने लिहिले आहे, “पनवेल चा बिहार आणि उत्तरप्रदेश झालाय” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्यांना असं करताना लाज कशी वाटली नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “बापरे देशात काहीही घडू शकतं”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






