Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्ताननंतर बांग्लादेशात लूटमार…! लोकांनी BATA आणि KFC च्या दुकानांना लुटलं, साधा पाण्याचा ग्लास पण ठेवला नाही; Video Viral

Bangladesh Video Viral: पाकिस्ताननंतर बांगलादेशमधील लुटमारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. यात लोक अक्षरशः नेम प्लेटवरील LED लाईट्ससुद्धा काढून नेताना दिसून आले.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 09, 2025 | 10:33 AM
पाकिस्ताननंतर बांग्लादेशात लूटमार...! लोकांनी BATA आणि KFC च्या दुकानांना लुटलं, साधा पाण्याचा ग्लास पण ठेवला नाही; Video Viral

पाकिस्ताननंतर बांग्लादेशात लूटमार...! लोकांनी BATA आणि KFC च्या दुकानांना लुटलं, साधा पाण्याचा ग्लास पण ठेवला नाही; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

पाकिस्तानची अवस्था अशी झाली आहे की मागेच इथल्या लोकांनी नाव कोर दुकानं लुटल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यातच आता असाच एक व्हिडिओ बांगलादेशमधून समोर आला आहे ज्याने सर्वत्र खळबळ उडवली आहे. आता बांगलादेशच्या लोकांनीही दुकान लुटल्याची माहिती समोर आली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे जो वेगाने व्हायरल होत आहे. लोक अक्षरशः दुकानात घुसून सामान लुटताना आणि दुकानाबाहेर फेकताना दिसून आली. एवढंच काय तर KFC नावामधील LED लाईट्ससुद्धा काढून नेण्यात आल्या. हा सर्वच प्रकार फार धक्कादायक असून सोशल मीडियावर आता याची चांगलीच चर्चा रंगत आहे. घटनेत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

ॲनाकोंडाने मगरीला घेतलं विळख्यात, पाण्याचा राक्षस तडफडत राहिला पण शेवटी जे घडलं…; भयंकर शिकारीचा Video Viral

काय आहे व्हिडिओत?

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये गाझा पट्टीवरून वाद सुरू आहेत, यात बांगलादेशी लोक पॅलेस्टाईनच्या बाजूने असल्याचे म्हटले जात आहे. बांगलादेशमध्ये सोमवारी देशभरात इस्रायलविरोधी निदर्शने झाली. हजारो लोक रस्त्यावर उतरले आणि गाझामधील इस्रायली हल्ल्यांचा निषेध करत घोषणाबाजी केली. यावेळी, जमावाने इस्रायल, अमेरिका आणि त्यांच्या सहयोगी देशांशी संबंधित व्यवसायांना लक्ष्य केले आणि तोडफोड केली.

बोगरा, सिल्हेट आणि कॉक्स बाजारसह अनेक जिल्ह्यांमध्ये बाटा, केएफसी आणि पिझ्झा हट सारख्या प्रतिष्ठित दुकानांवर हल्ले झाले. निदर्शक हिंसाचाराचा अवलंब करत होते आणि बांगलादेशात इस्रायली उत्पादनांवर बंदी घालण्याची मागणी करत होते. व्हायरल व्हिडिओमध्ये भलामोठा लोकांचा जमाव बाटा आणि केएफसीची दुकानं लुटताना आणि त्यांची तोडफोड करताना पाहू शकता. भारतातच काय संपूर्ण देशभरात आता या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Bangladeshi Islamists are looting every international company.

Yesterday they looted KFC and Bata, calling them Israeli owned, while they are American and Czech owned.

Foreign companies need to exit Bangladesh before they lose it all. pic.twitter.com/t7l0c9W6dN

— Arun Pudur (@arunpudur) April 8, 2025

पायात बूट बसत नाही म्हणून व्यक्तीने असा चमत्कारी जुगाड लावला की पाहून सर्वांचेच होश उडाले, Video Viral

लुटमारीचा हा व्हिडिओ @arunpudur नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘बांगलादेशी इस्लामवादी प्रत्येक आंतरराष्ट्रीय कंपनीला लुटत आहेत. काल त्यांनी केएफसी आणि बाटा यांना इस्रायलच्या मालकीचे म्हटले आणि लुटले, तर त्या अमेरिकन आणि चेक गणराज्याच्या मालकीच्या आहेत. परदेशी कंपन्यांना सर्वकाही गमावण्यापूर्वी बांगलादेशातून बाहेर पडावे लागेल’ असे लिहिले आहे. व्हिडिओला चांगलंच व्युज मिळाले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत या लुटमारीवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “परदेशी गुंतवणूकदारांनी युनुस आणि त्याच्या बांगलादेशी रानटी लोकांना धडा शिकवला पाहिजे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जसे कराल तसे भराल”.

Web Title: People looted the bata and kfc showrooms in bangladesh shocking video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2025 | 10:33 AM

Topics:  

  • Bangladesh
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

Kissing To CM: पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे घेतले चुंबन; पाकिस्तानमध्ये बवाल! Viral Video पाहून तुम्हीही व्हाल गपगार
1

Kissing To CM: पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे घेतले चुंबन; पाकिस्तानमध्ये बवाल! Viral Video पाहून तुम्हीही व्हाल गपगार

आधी थप्पड मग मारली बाटली…; पाकिस्तानमध्ये श्वानासोबत अमानवीय कृत्य, VIDEO VIRAL
2

आधी थप्पड मग मारली बाटली…; पाकिस्तानमध्ये श्वानासोबत अमानवीय कृत्य, VIDEO VIRAL

ताईंनी यमराजाशी सेटिंग लावून ठेवलीये! अंगावरून अख्खा चालता ट्रक गेला तरी साधा एक ओरखडाही आला नाही; धक्कादायक Video Viral
3

ताईंनी यमराजाशी सेटिंग लावून ठेवलीये! अंगावरून अख्खा चालता ट्रक गेला तरी साधा एक ओरखडाही आला नाही; धक्कादायक Video Viral

‘त्या’ रात्री रेल्वेच्या AC डक्टमधून असं काही बाहेर आलं की…; प्रवाशांसह पोलिसही थक्क, Video Viral
4

‘त्या’ रात्री रेल्वेच्या AC डक्टमधून असं काही बाहेर आलं की…; प्रवाशांसह पोलिसही थक्क, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.