Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Photo : पुणे तिथे काय उणे! ना कार, ना फ्लॅट… २५ हजाराची नोकरी, पुण्यातील युवक वधूच्या शोधात; थेट बिलबोर्डवर दिली जाहीरात

Pune Viral Billboard : माणूस लग्नाळू आहे...! मुलगी भेटेणा म्हणून पुणेरी तरुण त्रासला आणि त्याने थेट बिलबोर्डवर दिली लग्नाची जाहीरात. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून यूजर्सने जाहीरातीवर आपल्या मिश्किल प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 14, 2026 | 12:24 PM
Viral Photo : पुणे तिथे काय उणे! ना कार, ना फ्लॅट... २५ हजाराची नोकरी, पुण्यातील युवक वधूच्या शोधात; थेट बिलबोर्डवर दिली जाहीरात

Viral Photo : पुणे तिथे काय उणे! ना कार, ना फ्लॅट... २५ हजाराची नोकरी, पुण्यातील युवक वधूच्या शोधात; थेट बिलबोर्डवर दिली जाहीरात

Follow Us
Follow Us:
  • पुण्यातील एका तरुणाने लग्नासाठी हटके मार्ग अवलंबल्याने सर्वांचे लक्ष वेधले.
  • त्याच्या अनोख्या कल्पनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
  • या आगळ्यावेगळ्या प्रकारावर नेटकऱ्यांनी मिश्किल आणि मजेशीर प्रतिक्रिया दिल्या.
विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर फक्त आपल्या ऐतिहासिक वारशासाठी ओळखले जात नाही तर तिथल्या लोकांची बेधडक बोलण्याची शैली आणि पुणेरी पाट्या यासाठीही ओळखले जाते. सोशल मिडियावरही पुण्यातील अनेक आगळे-वेगळे प्रकार शेअर केले जातात. अलिकडे इथे एका व्यक्तीच्या लग्नाची जाहीरात शेअर करण्यात आली आहे. या जाहीरातीत त्याने आपली आर्थिक परिस्थिती शेअर करत, बघण्यात कोणती मुलगी असेल तर सुचवा अशी इच्छा व्यक्त केली. आता लग्नाची अशी जाहीरात तुम्ही बऱ्याचदा वर्तमानपत्रात पाहिली असेल पण व्हायरल जाहीरात ही कोणत्या वर्तमानपत्रात नाही तर बिलबोर्डवर करण्यात आली होती जे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. चला या जाहीरातीत नक्की कोणत्या गोष्टी नमूद करण्यात आल्या होत्या ते जाणून घेऊया.

कुणाला विचारुन फोटो काढला? पर्यटकावर जंगली बैल झाला नाराज, धावत आला अन् ८ फूट उंचावर व्यक्तीला हवेतच फेकले…; VideoViral

काय लिहिलं होतं जाहीरातीत?

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर भागातील एका ३० वर्षीय तरुणाने ही जाहीरात दिली होती. लग्नासाठी तो सुशील मुलीच्या शोधात असून आपली आर्थिक परिस्थितीही त्याने यात नमूद केली होती. त्याने नाशिक फाटा-पिंपळ सौदागर या वर्दळीच्या रस्त्यावर एक मोठा प्रचंड मोठा बॅनर लावला आणि यात लग्नासाठीची जाहीरात दिली. जाहीरात फार सोपी, सहज आणि बेधडक होती. यावर कोणतेही चित्र नव्हते तर फक्त शब्दात आपल्या भावना आणि इच्छा-आकांशा व्यक्तीने व्यक्त केल्या होत्या.

बॅनरवर लिहिले होते की –

“नाव – राधव विश्वासराव शिंदे
वय – ३० वर्ष
माझ्याकडे कार, फ्लॅट, शेती नाहीये.
पगार २५०००/- आहे.
लग्रासाठी मुलगी असेल तर नक्की सुचवा…”

राघवने लग्नाच्या जाहीरातीसाठी कोणत्याही वधूवर सूचक मंडळाचा किंवा ॲप्सचा वापर केला नाही तर त्याने थेट सार्वजनिक ठिकाणीच वधूसाठीची आपली इच्छा व्यक्त केली जे पाहून लोकांना धक्का बसला. इतकंच नाही तर रस्त्याने जाणाऱ्या अनेक प्रवाशांनाही लग्नाची ही जाहीरात पाहून धक्का बसला. यामधीलच एकाने जाहीरातीचे हे दृष्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केले आणि नंतर सोशल मिडियावर त्याला शेअर केले.

‘५०० रुपये देईन, माझी खोली जवळच आहे’, रिक्षा ड्रायव्हरने महिला प्रवाशाला दिली ती अश्लिल ऑफर; Video Viral

यूजर्सच्या प्रतिक्रिया

घटनेचा व्हिडिओ @life.with_vedanti.rakesh नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चांगलाच चर्चेत असून अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मिश्किल प्रतिक्रिया देत या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. यात एका यूजरने म्हटले की, “फोन नंबर कोण लिहिणार?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पुण्यात जॉब आहे मग मुलगी मिळणार तुला”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “ भावा माझ्याकडे सगळ आहे …. तरीपण कोण अजून मिळाले नाहीत आणि वय एक वर्ष कमी आहे तुझ्यापेक्षा”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Pune man searches for bride give advertisement on billboard viral banner video news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 12:24 PM

Topics:  

  • funny viral video
  • Pune Viral Video
  • viral news

संबंधित बातम्या

बंगळुरूमध्ये थरार! फूटपाथवरून ट्रान्सफॉर्मरचा ब्लास्ट! तरुण गंभीर जखमी; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral
1

बंगळुरूमध्ये थरार! फूटपाथवरून ट्रान्सफॉर्मरचा ब्लास्ट! तरुण गंभीर जखमी; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral
2

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral
3

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral
4

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.