(फोटो सौजन्य: Twitter)
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्हाला रोज काही ना काही व्हायरल होताना दिसेल. इथे माणसांचे पराक्रमच नव्हे तर प्राण्यांचे व्हिडिओही शेअर केले जातात. प्राण्यांचे हे असे व्हिडिओज लोक फार मजा घेऊन बघतात ज्यामुळे कमी वेळातच ते व्हायरल होतात. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्ये फार थरारक असून यात किंग कोब्रा आणि अजगराची लढत दिसून येत आहे. आता भल्याभल्यांची हवा टाइट करणारे जंगलातील हे दोन विषारी प्राणी जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा कोण कोणावर मात करतं आणि विजयी ठरतं हे पाहणं फार ,मनोरंजक ठरेल. व्हिडिओत नाक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये किंग कोब्रावर अजगराने पूर्णपणे नियंत्रण केल्याचे एका व्हिडिओमध्ये दिसत होते. जगातील सर्वात लांब विषारी साप असलेला किंग कोब्रा यावेळी अजगराच्या शक्तीपुढे हतबल झाला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच तो वाऱ्यासारखा पसरला. त्यांच्या लढतीतील थरार पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.
रेल्वे स्टेशनवरच पत्नीने पतीला केली मारहाण, एका फटक्यात उचलले आणि जमीवरच नेऊन आपटले; Video Viral
व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की अजगराने कोब्राला त्याच्या लांब शरीराने पकडून खाली दाबून ठेवले आहे. किंग कोब्रा जीवघेण्या स्थितीत होता, पण तो लढण्याचा प्रयत्न करत होता. 30 फूट लांब असणारा अजगर आपल्या स्नायूंनी कोब्राला चिरडत असल्याचे स्पष्ट दिसून येते. दोघांनीही एकमेकांना असे जकडून ठेवले होते की पाहून सर्व युजर्स थक्क झाले. किंग कोब्रा विषाने हल्ला करण्यात तरबेज आहे, पण या व्हिडिओमध्ये त्याचे विष काम करत नाही. अजगर आधीच त्याच्याभोवती गुंडाळला होता आणि कोब्राला चावण्याची संधी मिळाली नाही. त्याचा श्वासोच्छवास थांबलेला दिसत होता आणि त्याची अवस्था अशी होती की तो मरणार होता. दोघेही अनेकदा जंगलात एकमेकांशी भिडतात, पण यावेळी अजगर जिंकला. लोक कमेंट्समध्ये लिहित आहेत, “कोब्राचे विषही अजगराच्या शक्तीपुढे हरले!” ही लढत पाहून सगळेच हैराण झाले.
The vicious cycle of survival of the fittest between the largest venomous snake on the planet, the King Cobra vs the longest non-venomous snake on the planet the Reticulated Python!
They both share the jungle floor in Indonesia 🇮🇩!
Who do you think won the battle? 😳 pic.twitter.com/mYnbu7YSh6
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) April 27, 2024
व्हॅक्युम क्लिनरमध्ये मुलाची आत्मा केली कैद; थरारक दृश्ये पाहून आवाक् व्हाल; Video Viral
अजगर कोब्राच्या लढतीचा हा थरार @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 1 मिलियनहुन अधिकचे व्युज मिळाले असून यावर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ते दोघेही मरतील. तो एक डेडलॉक आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कोब्रा विष प्रभावी होण्याची वाट पाहत आहे, मला वाटतं, तो आधीच मारला गेला नाही तर त्याला जिंकता आलं असतं”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.