सेल्फीनेच केला घात! हरिहरेश्वरच्या समुद्रात बुडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू; काळजाचा ठोका चुकवणारा Video Viral
सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे कधी हास्यास्पद व्हिडिओ शेअर होतात तर कधी अपघातांचे थरार शेअर केले जातात. याचबरोबर जुगाड आणि स्टंट्सचे व्हिडिओ देखील इथे वेगाने व्हायरल होत असतात. आताही इथे एका धक्कादायक घटनेने नोंद घेतली आहे ज्यातील दृश्य फार पाहून आता अनेकांना धक्का बसला आहे. कोणत्याही सुंदर ठिकाणी आपण फिरायला गेलो की प्रथम तेथील सुंदर दृश्य आपण आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करू पाहतो. मात्र आपली हीच सवय आता एका महिलेच्या जीवावर बेतल्याची घटना घडून आली आहे. नक्की काय घडलं सविस्तर जाणून घेऊया.
अरे अक्कल काय गहाण ठेवली का? व्यक्तिने चक्क महिलेच्या स्कर्टला लावली आग; धक्कादायक Video Viral
काय आहे व्हिडिओत?
ही घटना 23 मार्चला सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडून आली. हरिहरेश्वर बीचला फिरायला जाण्यासाठी महिलांचा एक ग्रुप इथे पोहचला. यावेळी त्यातील एका महिलेने समुद्राच्या किनाऱ्यावरील खड़कावर फोटो काढायला सुरुवात केली मात्र यावेळी अचानक तिचा पाय घसरला आणि ती समुद्राच्या खोल पाण्यात ती पडली. यावेळी समुद्राच्या लाटा ओसंडून वाहत होत्या अशात समुद्राच्या या विशालकाय लाटांमध्ये ती ओढत गेली. सुमारे 15 मिनिटं ती या पाण्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होती मात्र याचा काहीच उपयोग झाला नाही आणि पाण्यात बुडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
यानंतर स्पोर्ट्स ॲक्टिविटीला याबाबत कळविण्यात आले. दोन तरुणांनी मिळून महिलेला पाण्यातून बाहेर काढलं खरं मात्र तोपर्यंत तिचा जीव गेला होता. हे संपूर्ण दृश्य आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून लोक आता हे पाहून आवाक् झाले आहेत तर काहींनी महिलेच्या या दुर्दैवी मृत्यूवर आपली खंत व्यक्त केली आहे. या घटनेवरून आपल्याला एकच तात्पर्य मिळते की, निसर्ग कितीही सुंदर असले तरी याचे रौद्र आपल्या जीवावर बेतू शकते.
या घटनेचा व्हायरल व्हिडिओ @therefore_ritzz नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिले असून अनेकांनी कमेंट्समध्ये या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “निसर्गाचा आनंद घ्यावा, उगाच अतिरेक करू नये” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “माझ्या गावातली घटना आहे ही… तिकडे जाण्यास सक्त मनाई आहे तरी पण जातात आणी असं वाईट घडून बसत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.