संपूर्ण देशभरात १ मार्च २०२२ ला महाशिवरात्रीचा (Mahashivratri 2022) उत्सव साजरा केला जाणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर आणि पार्वती यांचा विवाह झाला होता. महाशिवरात्रीच्या (Mahashivratri Special) दिवशी लोक उपवास करतात. तसेच शंकर आणि पार्वतीकडे आपल्या इच्छा व्यक्त करतात. संपूर्ण जगभरात शंकर आणि पार्वतीचे अनेक भक्त आहेत. मात्र आज आपण अशा माणसाविषयी बोलणार आहोत ज्याने वेगळ्या पद्धतीने शंकर आणि पार्वतीची आराधना (Shiv Puja In A Different Way) केल्याचे समोर आले आहे.
[read_also content=”चमकणारी त्वचा हवीये? ‘ही’ एकच गोष्ट दुधात मिसळून चेहऱ्यावर लावा ; प्रत्येकजण विचारेल सौंदर्याचे रहस्य https://www.navarashtra.com/latest-news/fashion-beauty/do-you-want-glowing-skin-mix-this-one-thing-with-milk-and-apply-it-on-the-face-everyone-will-ask-the-secret-of-beauty-nrab-246577.html”]
या व्यक्तीचं नाव दुर्गा प्रसाद पांडेय (Durga Prasad Pandey) असं आहे. दुर्गा प्रसाद पांडेय हे पर्यावरणप्रेमी आहेत. दुर्गा प्रसाद पांडेय गेल्या १५ वर्षांपासून देशात विशेषत: दिल्ली एनसीआरमध्ये बेलाची झाडं लावत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत दिड लाखापेक्षा जास्त झाडं लावली आहेत. यामध्ये १ लाख १८ हजार फक्त बेलाची रोपं आहेत.
दुर्गा प्रसाद पांडेय गाजियाबादच्या वसुंधरा भागात एका झोपडीत राहतात. त्यांनी बेलाच्या झाडांची नर्सरी तयार केली आहे. गरजू लोकांना ते ही रोपं देतात. तसेच लोकांनी बेलाची झाडं लावावी म्हणून ते प्रोत्साहन देत असतात. इतकंच नाही तर दुर्गा प्रसाद पांडेय , लग्न, मुंडन,वाढदिवस अशा दिवशी लोकांना बेलाच्या झाडांची भेट देतात.
बेलाच्या झाडांविषयी दुर्गा प्रसाद पांडेय यांनी सांगितलं की, ही झाडं पर्यावरणासाठी चांगली आहेत. बेलाची पानं भगवान शंकराला खूप आवडतात. या कारणामुळे पूजा करण्यासाठी बेलाच्या पानांचा वापर केला जातो. दुर्गा प्रसाद पांडेय गेल्या १ वर्षापासून शिवकिर्तन करत आहेत. किर्तनाला येणाऱ्या अनेक लोकांना ते शिवभक्तीसह पर्यावरणाविषयीही जागरुक करतात.
दुर्गा प्रसाद पांडेय सांगतात की, जगात प्रदूषण आणि रेडिएशनमुळे अनेक आजार पसरत आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावूनच आपण पृथ्वीला हरित ठेऊ शकतो.