एकच नंबर...! गरब्यावर चिमुकल्यांचा रंगला अफलातून खेळ; स्टेप्स पाहून नेटकरी हैराण, म्हणाले... Video Viral (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
आज नवरात्रीचा आठवा दिवस आहे. सगळीचे आनंदाचे जल्लोषाचे वातावारण आहे. लोकांच्या घरी देवीची स्थापना, पूजा आणि गरबा रंगला आहे. या नवरात्रीत सर्वात खास आकर्षण असतो तो म्हणजे गरबा. जिथे लहान-मोठे सगळेच आनंदाने एकत्र येऊन उत्सवर साजरा करतात. एकत्र येऊन वेगवेगळ्या स्टाईलमध्ये गरबा नृत्य करते. कोणी पारपंरिक गरब्याचा थाट मांडतो, तर कोणी फ्यूजन म्हणजे मॉर्डन आणि पारंपारिक स्टेप्स करत गरबा करतो. यामध्ये केवळ मोठेच नाही, तर लहान मुले देखील आनंदाने डान्स करत असतात. सध्या देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी सर्वत्र नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स तुम्ही अनेक गरबा खेळतानाचे व्हिडिओ (Video) पाहिले असतील. सध्या असाच एक काही चिमुकल्यांचा गरबा खेळतानाचा भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका गुजराती गाण्यावर एक चिमुकला गरबा खेळत आहे, अशी स्टेप्स तर मोठ्यांना देखील जमणार नाहीत असे नृत्य चिमुकला करत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर चिमुकल्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील चिमुकल्यांचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.
IND vs PAK : आशिया कप हारताच पाकिस्तानची उडाली खिल्ली; सोशल मीडियावर Memes चा पाऊस
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @the_dancekingdom या अकाउंटवर शेअक करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्श्नमध्ये जेव्हा गरबा तुमचा जीव असतो आणि बॉलीवूड तुमचा प्राण असतो तेव्हा… असे लिहिले आहे. तसेच या व्हिडिओच्या पीओव्ही(POV) म्हणजे पाइंट ऑफ व्ह्यू- द गुगल स्टेप्स असे लिहिले आहे. अनेकांनी चिमुकल्यांचे भरभरुन कौतुक केल आहे. सर्वांनी याला एकच नंबर स्टेप्स म्हटले आहे. एका युजरने हा नक्कीच अक्षय कुमार बनणार असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने ओह हो स्वॅग… असे म्हटले आहे. तिसऱ्या एका नेटकऱ्याने भाऊ मी तर याच्याकडून गरब्याचे क्लास घेणार पुढच्या वेळी असे म्हटले आहे. अशा पद्धतीने अनेकांनी चिमुकल्याचे भरभरुन कौतुक केले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.