'न्यूड फोटो पाठव'... शिक्षकाचा विद्यार्थीनींना अश्लील मेसेज; पालकांकडून बेदम मारहाण, VIDEO व्हायरल
सध्या मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले आहे. मुलींच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्नचिन्ह पालकांसमोर उभे राहिले आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका शिक्षकानेच विद्यार्थीनींना अश्लील मेसेज पाठवले आहेत. यामुळे हे समजताच पालकांनी या शिक्षकाला बेदम मारहाण केली आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना हिमाचल प्रदेशीतल असल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे.
असे म्हणतात की शिक्षक आणि विद्यार्थ्याचे नाते अत्यंत पवित्र असते. विद्यार्थ्याच्या आयुष्याला चांगले वळण देण्याचे त्यांना शिस्त लावण्याचे काम आई-वडिलांनंतर शिक्षक करतात. पण जेव्हा शिक्षकच भक्षक बनतो त्यावेळी संताप येतो. यामुळे हिमाचल प्रदेशीतल एका शिक्षकाने काळीमा फासणारी गोष्ट केली. यामुळे पालकांनी त्याला बेदम मारहाण केली आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी संताप देखील व्यक्त केला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हा पाहू शकता की, संतप्त झालेला पालक शिक्षकाला चपलीने मारताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या शिक्षकाने एका विद्यार्थीनीला अश्लील मेजेस पाठवण्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थीनीच्या कुटूंबीयांनी शिक्षकाला शाळेत मारहाण केली आहे. शाळेत घुसून शिक्षकाला चपलीने बेदम मारले आहे. तसेच पोलिसांकडे शिक्षकाविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप यावर इतर कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. सध्या शिक्षकाच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
#Hamirpur
टीचर अपने ही स्टूडेंट्स को अश्लील MSG करता, फिर परिवार वालो ने टीचर पर चलाया, चप्पल जूता, तो इश्क का भूत उतर गया
pic.twitter.com/C09qLon62R— Vikash Sahu/विकाश साहू X (@VikashSahuftp) November 30, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @VikashSahuftp या अकाऊंटवर पोस्ट करुन या घटनेची माहिती देण्यात आली आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर संतापजनक प्रतिक्रीया दिलेल्या आहेत. एका युदरने म्हटले आहे की, अशा शिक्षकांचे तोंड काळे करुन त्यांची वरात काढली पाहिजे, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, आता मुली शाळेत देखील सुरक्षित राहिल्या नाहीत. आणकी एकाने म्हटले आहे की, मला तर अशा घटना ऐकल्या की माझ्या मुलीची काळजी वाटते. मुलींसाठी कधी सगळे सुरक्षित होणार आहे की नाही? असाही प्रश्न एका युजरने विचारला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.