फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा मजेशीर तर कधी चित्र-विचित्र घटना व्हायरल होत असतात. एक दिवसापूर्वीच एक अशीच घटना व्हायरल होत होती. ज्यामध्ये एका दिल्लीच्या माणसाने स्विगीला कांदे मोफत मागतिले होते.विषेश म्हणजे स्विगीने ही मागणी पूर्ण देखील केली होती. सध्या असाच काहीसा प्रकार एका नवरदेवासोबत घडला आहे. पण त्याने कोणतीही गोष्ट फ्री मागवली नाही उलट असे काही केले आहे की, ज्यामुळे सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.
तुमच्या सोबत असे अनेकदा झाले असेल की, कुठेबाहेर जायचे असेल, किंवा मिटींगला जायचे असेल तर कोणती ना कोणती महत्त्वाची गोष्ट तुम्ही विसरला असाल. अनेकदा अनावधानाने आपण महत्त्वाच्या गोष्टी विसरतो आणि मग अशा वेळी काय करावे सुचत नाही. तसेच लग्नच्या वेळी तर अशा गोष्टी अनेकदा होतात. लगीनघाईत बऱ्याच वस्तू विसरतात. पण इथे चक्क नवरदेवच त्याला हळदी समारंभात घालायचा कुर्ता विसरला आहे. पण त्यानंतर 10 मिनियटांत असे काही घडले आहे की, यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.
…अन् नवरदेव कुर्ता विसरला
तर झाले असे की, बंगळूरमधील एक नवरदेव त्याच्या हळदीच्या समारंभाचा कुर्ता घरी विसरला. यामुळे हळदीच्या दिवसी लग्नात सकाळी गोंधळ उडाला. कुटूंबातले सगळेजण टेंशनमध्ये आले होते. मग या नवरदेवाने असे काही केले की जाणून आश्चर्य वाटेल. त्याने लगेचच स्विगी इन्स्टामार्ट वरुन कुर्ता मागवला. त्यानंतर लगेचच त्याला दहा मिनिटांत त्याची डिलीव्हरी केली. याची माहिती या नवरदेवाने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट @ramnathshenoy22 एक्सवर शेअर केली आहे. त्याने स्विगी इस्टामार्टचे देखील आभार मानले आहे. या पोस्टमुळे सध्या स्विगीचे कौतुक होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल पोस्ट
36 hours to my wedding, and @SwiggyInstamart deserves a seat at the mandap!
Haldi morning chaos = forgot my yellow kurta. Family wrath loading… until Instamart saved the day with a Manyavar kurta in 8 minutes (here’s me rocking it 10 minutes later).
Then came the Haldi… pic.twitter.com/zTJyrGOQJ6
— Ramnath Shenoy (@ramnathshenoy22) November 26, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेल्या पोस्टला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. या पोस्टवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, आता तुला आयुष्यभर याचे टोमणे ऐकावे लागणार तर दुसऱ्या एका युजरने म्हटसले आहे की, चांगले झाले, तर आणखी एका युजरने म्हटले आहे की, तुमचे नियोजन चुकले. चौथ्या एका युजरने म्हटले आहे की, स्विगी खरंच स्मार्ट झाले आहे. या पोस्टवर स्विगीचा देखील रिप्लाय आला आहे. स्विगीने म्हटले आहे की, तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, आम्ही आमच्या सर्व वापरकर्त्यांसाठी खूप चांगला आणि आनंददायक अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहोत.”
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.