shocking viral video a woman strips naked running down on texas airport video goes viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र असे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा धक्कादायक घटनांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या अमेरिकेच्या टेक्सासमधील डॅलस फोर्ट आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडलेल्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला नग्न अवस्थेत विमानतळावर फिरताना दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 14 मार्च रोजी ही घटना घडली. एक मानसिक रुग्ण असलेली महिला अचानक नग्न अवस्थेत फिरु लागली. तिने अनेक लोकांवर हल्ले केले. यामुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरलेले होते. मीडिया रिपोर्टनुसार महिलेने दोन लोकांवर पेन्सिलने हल्ला केला. तिला नियंत्रित करणाऱ्या रेस्टॉरंट मॅनेजरवरही तिने वार केला. मीडियारिपोर्टनुसार, तिने मॅनेजरवर डोक्यात आणि चेहऱ्यावर मार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये ती विमानतळावक गोंधळ घालताना दिसत आहे. या महिलेने विमानतळावरील प्लाझमा स्क्रीन देखील फोडली आहे. ती लोकांवर पाणी फेकत त्यांना शिवीगाळ करताना दिसत आहे. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले असून त्यावेळी तिच्या शरीरावर रक्त आढळून आले.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Woman strips n*ked and storms through Dallas Fort Worth Airport in a huge public meltdown
The woman shrieked and sprinted down the concourse, leaving the frame, while no authorities were seen intervening
There were no signs of restraints, arrests, or immediate action taken by… pic.twitter.com/8y8jGfCGwq
— Unlimited L’s (@unlimited_ls) March 27, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @unlimited_ls या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले आहे. अनेकांनी नेमके काय घडलं असे विचारले आहे. सध्या महिला पोलिसांच्या कस्टडीत असून तिची चौकशी सुरु आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. अनेकांनी ती मानसिक रुग्ण आहे, मग मनोपचार डॉक्टरांना बोलवायला हवे असे म्हटले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.