Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आईच्या जीववर उठला मुलगा, फोन हिसकावताच डोक्यात घातली बॅट, धक्कादायक घटनेचा Video Viral

सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. यात एक लहान मुलगा आईने आपल्या हातून फोन हिसकावल्याने तिच्याच जीवावर उठल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा सर्व प्रकार पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 04, 2024 | 01:25 PM
आईच्या जीववर उठला मुलगा, फोन हिसकावताच डोक्यात घातली बॅट, धक्कादायक घटनेचा Video Viral

आईच्या जीववर उठला मुलगा, फोन हिसकावताच डोक्यात घातली बॅट, धक्कादायक घटनेचा Video Viral

Follow Us
Follow Us:

आजच्या युगात मोबाईल हा आपल्या रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. आजकाल मोठेच काय तर लहान मुलेही या फोनच्या आहारी गेली आहेत. सकाळपासून ते रात्रीपर्यंत हा फोन आपल्या हातात असतो. हे फोन आता एक व्यसनच बनले आहे. उठता बसता खाता पिता प्रत्येक गोष्टीसाठी आता लोकांना आपल्याजवळ फोन हवा असतो. आजकाल लहान मुलंही या फोनच्या इतक्या आहारी गेली आहेत की, बाहेर फिरणं, खेळणं, बागडणं या सर्व गोष्टी ते विसरून गेले आहेत. मैदानी खेळदेखील आता मुलं या फोनवरच खेळायला बघतात.

फोनचे व्यसन लहान मुलांना इतके जास्त लागले आहे की अनेकदा याच्या नादात ते नेहमी नको ते करून बसतात. कधी कधी ते यासाठी इतके हिंसक होतात की, ते पाहून पालकांनाच त्यांची भीती वाटू लागते. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात आईने मोबाईल चालवण्यास मनाई केल्याने मुलगा थेट आपल्या आईच्याच जीवावर उठला आहे.

हेदेखील वाचा – धक्कादायक! चिमुकलीच्या अंगावर पडला भलामोठा फ्रिज, अंगावर काटा आणणारा Video Viral

काय प्रकरण आहे?

व्हिडिओमध्ये जर आपण पाहिले तर दिसते की, घरात बेडवर शाळेच्या गणवेशात एक लहान मुलगा फोन खेळात बसला आहे. जवळच टीव्हीदेखील चालू आहे. तितक्यात तिथे त्याची आई येते आणि त्याला मोबाईलवर खेळताना पाहून ती त्याला ओरडते आणि त्याच्याकडून मोबाईल हिसकावून त्याला अभ्यास करण्यास सांगते. मग मुलगा पुस्तक घेऊन बेडवर बसतो. आई जेवणाचे ताट घेऊन जमिनीवर बसते आणि टीव्ही पाहू लागते. त्यानंतर मुलगा अचानक तिथून उठतो आणि किचनमध्ये जातो, तो पुन्हा येतो तेव्हा हॉलच्या बाजूला एक क्रिकेट बॅट ठेवलेली असते. मुलगा क्षणार्धाचाही विचार करत नाही आणि लगेच ती बॅट उचलून समोर बसलेल्या आपल्या आईच्या डोक्यात मारतो.

बॅट लागताच मुलाची आई जमिनीवर कोसळते मात्र मुलाच्या चेहऱ्यावरची एक रेगही हलत नाही. यानंतर मुलगा चक्क बेशुद्ध आईच्या हातातून मोबाईल फोन हिसकावतो आणि पुन्हा गेम खेळायला सुरुवात करतो. ही सर्व थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून आता अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Mobile phones addiction: See how this child took the life of his own mother. pic.twitter.com/FUIl9ExZRg — Baba Banaras™ (@RealBababanaras) October 2, 2024

हेदेखील वाचा – तळघर साफ करताना मालकाला सापडली ‘रहस्यमयी’ पेंटिंग’, सत्य समोर येताच क्षणार्धात बनला मालामाल

या घटनेचा व्हिडिओ @Baba Banaras नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, मोबाईलचे व्यसन, पहा या मुलाने कसा घेतला स्वतःच्या आईचा जीव असे लिहिण्यात आले आहे. अनेकांनी यावर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, ” 15 वर्षांखालील मुलांना मोबाईल दिला नाही पाहिजे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे स्क्रिप्टेड वाटत आहे”.

Web Title: Shocking viral video mother snatches mobile phone hits sons head with cricket bat in anger viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2024 | 01:24 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
1

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या
2

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

Mumbai Women Safety:  ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!
3

Mumbai Women Safety: ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत;  VIDEO VIRAL
4

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत; VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.