अनेक वेळा असे घडते की आपण जिथे राहतो त्या ठिकाणाची संपूर्ण माहिती आपल्याला नसते. अशा स्थितीत येथे काही विचित्र दिसले की धक्का बसणे स्वाभाविक आहे. असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेबाबत ऐकून आता अनेकांना आश्चर्यचाच धक्का बसला आहे. घर साफ करणाऱ्या एका महिलेसोबतही एक धक्कादायक प्रकार घडून आला. या प्रकाराने आता सोशल मीडियावर धुमाकूळ माजवली आहे.
घडले असे की, घराच्या तळघरात पोहचताच महिलेला एक आश्चर्यकारक गोष्ट दिसली. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, एका इटालियन महिलेला तिच्या घराच्या तळघरात साफसफाई करताना काही विचित्र पेंटिंग्ज सापडल्या. ते अतिशय स्वस्त फ्रेममध्ये बसवलेले होते आणि ते खूपच भयानक दिसत होते. महिलेला जिवंत असताना त्याचे सत्य कळू शकले नाही, परंतु तिच्या मृत्यूनंतर त्याचे संपूर्ण वास्तव समोर आले.
हेदेखील वाचा – धक्कादायक! चिमुकलीच्या अंगावर पडला भलामोठा फ्रिज, अंगावर काटा आणणारा Video Viral
ही घटना 1962 सालची आहे. इटलीतील कॅप्री येथे राहणाऱ्या लुइगी लो रोसो यांना त्यांच्या घराच्या तळघरात वर्तुळात गुंडाळलेले एक विचित्र चित्र सापडले. हे पेंटिंग त्यांनी एका स्वस्त फ्रेममध्ये लावून आपल्या दिवाणखान्याच्या भिंतीवर टांगले. हे चित्र अनेक दशके तिथे लटकले पण रोसोच्या पत्नीला ते अजिबात आवडले नाही. एके दिवशी लुइगीचा मुलगा अँड्रिया कलेच्या इतिहासाबद्दल वाचत होता आणि त्याला पेंटिंगवरील स्वाक्षरी दिसली.
हेदेखील वाचा – हवेत अजगराने रचला मृत्यूचा सापळा, कावळ्याचं डोकं पकडून अशी केली शिकार पाहून तुम्हीही व्हाल हैराण, Viral Video
ॲड्रियाला शंका होती की, ही पेंटिंग सामान्य नसून यात काहीतरी विशेष आहे. अशा परिस्थितीत तिने स्थानिक तज्ज्ञांचा सल्ला घेण्यास सुरुवात केली. अनेक महिन्यांच्या तपासानंतर, सिंझिया अल्टीएरी नावाच्या ॲक्रेडिया फाऊंडेशनच्या सदस्याने पुष्टी केली की पेंटिंगवरील स्वाक्षरी इतर कोणीही नसून प्रसिद्ध स्पॅनिश कलाकार पाब्लो पिकासोची होती.
घराच्या मालकाच्या मृत्यूनंतर, त्यांचा मुलगा अँड्रियाला हे सत्य समजले की ही एक सामान्य नाही तर अमूल्य पेंटिंग आहे, जी 1930 ते 1936 दरम्यान बनविली गेली होती. आजच्या काळात या पेंटिंगची किंमत सुमारे 5 मिलियन पौंड म्हणजेच 55,71,31,188 रुपये आहे. त्यात चित्रित केलेली स्त्री ही फ्रेंच फोटोग्राफर आणि पेंटर डोरा मार आहे, जीही स्त्री 1945 पर्यंत पिकासोची गर्लफ्रेंड होती.