... म्हणून कधीही हार मानू नये! सापाने बेडकाला तोंडात पकडलं पण क्षणार्धातच असा उलटला डाव; थरारक Video Viral
सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवगेळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे बऱ्याचदा प्राण्यांच्या जीवनाशी संबंधित देखील काही व्हिडिओ शेअर केले जातात ज्यातून आपल्याला त्यांच्या जीवनाविषयीच्या काही रंजक गोष्टी आपल्या समोर येतात. अनेकदा हे व्हिडिओ सोशल मीडियावर काही वेळातच व्हायरल होतात. यातील दृश्ये लोकांना नेहमीच थक्क करून जातात. सध्या देखील असाच एक व्हिडिओ इथे शेअर झाला आहे ज्यातील दृश्ये पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. यात एक साप आणि बेडकातील संघर्ष दिसून आला. व्हिडिओत काय काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
साप हा जंगलातील सर्वात धोक्यादायक शिकाऱ्यांपैकी एक आहे. याच्या विषारी ताकदीसमोर अनेकदा सिंहाचीची हवा टाइट होते. जीवनचक्राविषयी शाळेत शिकताना तुम्ही अनेकदा हे पाहिले असेल की यात नेहमी साप बेडकाला खातो. अशात जेव्हा हे दोघेही समोर येतात तेव्हा यात बहुदा सापाच्या विजयाचे अवमान लावले जाऊ शकते. मात्र सध्याच्या व्हायरल व्हिडिओत बेडकाने सापाला पुरेपूर शिकस्त दिल्याचे दिसून येत आहे. आपल्या प्रयत्नांनी आणि बुद्धीने बेडूक सापाला असे वेडे बनवतो की पाहणारे पाहतच राहतात.
काय घडले व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये साप बेडकाची शिकार करण्याच्या पुरेपूर तयारीत असल्याचे दिसते. दोघेही एका गेटवर चिपकलेले असतात जिथे त्यांच्यात हा जीवन-मरणाचा संघर्ष सुरु असतो. साप बेडकाचे पाय पकडतो आणि त्याला आपल्या दिशेने ओढत त्याची शिकार करू पाहतो. मात्र बेडूकही काही आपली हार मनात नाही आणि जिवाच्या आकांताने आपल्या सापाच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करत राहतो. अथक प्रयत्नांनंतर त्याचा पाय तो सापाच्या तोंडातून मुक्त करतो आणि भराभर गेटवर चढतो आणि मग उड्या मारत मारत तेथून पळून जातो. व्हिडिओतील हा थरार पाहून आता अनेकजण थक्क झाले आहेत तसेच बरेचजण बेडकाच्या हुशारीवर त्याची प्रशंसाही करत आहेत.
दरम्यान बेडूक-सापाचा हा व्हिडिओ @mpsc_yoddha_ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोंकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले, “शाब्बास पट्ट्या” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खूप छान”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.