(फोटो सौजन्य: Twitter)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. मात्र सध्याच्या या व्हिडिओने संपूर्ण सोशल मीडिया हादरली आहे. हा व्हिडिओ आता वेगाने व्हायरल होत असून आता तो चर्चेचा विषय बनला आहे. हा व्हिडिओ दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून भारताचे प्रसिद्ध गायक उदित नारायणचा यांचा आहे ज्यात ते एक नव्हे दोन नव्हे तर चक्क फार फेमेल फॅन्सना किस करताना दिसून आले. मुख्य म्हणजे हा सर्व प्रकार त्याच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये घडून आला ज्यामुळे ही सर्व दृश्ये कॅमेरात कैद केली गेली आणि नंतर त्यांना सोशल मीडियावर शेअर केले गेले. या व्हिडिओने आता सर्वत्र धुमाकूळ माजवली असून चाहते हा सर्व प्रकार पाहून आश्चर्यचकित झाले आहेत.
उदित नारायण हे बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आहेत. त्यांचे वय 69 असून त्यांनी 80 आणि 90 चा काळ त्यांच्या गाण्यांनी अक्षरशः गाजवून सोडला. त्यांच्या आवाजाचे लाखो चाहते आहेत. आजही त्यांचे लाईव्ह शो पाहायला हजारोंची गर्दी पाहायला मिळते. अशाच एका लाइव्ह शो मधील एक धक्कादायक व्हिडिओ आता सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला आहे ज्यावर चाहत्यांद्वारे नाराजी व्यक्त केली जात आहे. यात नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊयात.
नक्की काय घडले?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, उदित नारायण ‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणे गात असताना त्याच्या महिला चाहत्यांनी त्याला स्टेजजवळ घेरले. याच वेळी एक महिला फॅन उदित नारायण यांच्या स्टेजजवळ येते आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढायला सुरुवात करते. यावेळी उदित नारायण सेल्फीसाठी त्यांच्या जवळ येतात मात्र तेवढ्यात महिला त्यांच्या गालावर किस करते. हे पाहून उदित नारायण देखील याच्या प्रतिउत्तरास त्यांच्या ओठांचे चुंबन घेतात. यानंतर ते इतर महिला फॅन्सनाही किस करताना दिसून येतात. या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच आता नेटकऱ्यांमध्ये सांतापाची लाट उसळल्याचे दिसून येत आहे.
असली जिंदगी तो ये जी रहे हैं हम लोग तो इनके लिए पोस्ट करने को आए हैं!pic.twitter.com/UeO86zfH1j
— ShivRaj Yadav (@shivaydv_) February 1, 2025
दरम्यान या संपूर्ण प्रकारचा व्हिडिओ @shivaydv_ नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोंकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बॉलीवूड हे पाश्चिमात्य सभ्यतेचे एक गटार आहे आणि त्यात राहणारे हे किडे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मुलींना काही प्रॉब्लेम नाही आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “उदित नारायण… तुम्हाला हे करणे ठीक वाटले?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.