(फोटो सौजन्य: instagram)
जंगलाशी संबंधित अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ इथे व्हायरल झाला आहे. यात सिंहाच्या शिकारीची दृश्ये दिसून आली. सिंहापासून आपला बचाव करण्यासाठी एक प्राणी अनोखी शक्कल लढवतो खरी मात्र नंतर त्याची एक चूक त्याच्या जीवावर बेतण्यास पुरेशी ठरते. सिंहाची ताकद आणि शिकार करण्याची प्रवृत्ती लक्षात घेता हे दृश्य खूपच भीतीदायक वाटते. सिंह त्याच्या मोठ्या डोळ्यांनी आणि तीक्ष्ण दातांनी पूर्णपणे सतर्क राहतो, जेणेकरून तो कोणत्याही प्राण्याला सहज पकडू शकतो. सिंहाची ही आक्रमक वृत्ती जंगलात राहणाऱ्या सर्व प्राण्यांसाठी धोक्याची घंटा ठरते.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये एक प्राणी सिंहाला पाहतो आणि घाबरून झुडपात लपून जातो. सिंहापासून पळून जाण्याचा एकच मार्ग त्याला सापडतो तो म्हणजे झुडपात लपून बसणे, जेणेकरून सिंह आपली उपस्थिती ओळखू शकत नाही. सुरुवातीला सिंहाला या प्राण्याचा आवाजही ऐकू येत नाही आणि हा प्राणी अतिशय शांतपणे कोणतीही हालचाल न करता लपून राहतो. सिंह आपली नजर इतके तिकडे करत या प्राण्याला शोधण्याचा आपला प्रयत्न करत बसतो.
सिंह तिथून जाईल तितक्यातच झुडपात लपलेला प्राणी हळूहळू थरथरू लागतो, त्याची हीच चूक त्याच्या मृत्यूच्या घेऱ्यात ओढते. सिंहाची तीक्ष्ण ऐकण्याची क्षमता आणि सतर्कतेला तो आवाज लगेच जाणवतो. सिंह ताबडतोब सावध होतो आणि सर्व शक्तीनिशी झुडपांकडे वळू लागतो. सिंह आपल्या दिशेने येत असल्याचे समजताच प्राणी झुडपातून बाहेर येतो आणि जिवाच्या आकांताने तिथून पाळण्याचा प्रयत्न करू लागतो. मात्र अखेर सिंह त्याला पकडतो आणि त्याला आपली शिकार बनवतो. जंगलात एखादी छोटीशी चूकही एखाद्या प्राण्याचा जीव घेऊ शकते हे या व्हिडिओने सिद्ध केले. आपली एक चूक आपल्यावर किती भारी पडू शकते याची प्रचिती आपल्याला या व्हिडिओतून पाहायला मिळते.
हा व्हायरल व्हिडिओ @successaffair_ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो युजर्सने पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स देखील केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “कशाला हालचाल केली” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो फार काळ टिकू शकला नसता सिंहाकडे वास घेण्याची शक्ती आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.