Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Spoiler दिला अन् थिएटरमध्ये झाला ‘क्लायमॅक्स’! चित्रपटगृहात तुफान हाणामारी; Video Viral

VIDEO Viral: 'स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे' चित्रपटाच्या शोदरम्यान एका तरुणाने चित्रपटातील महत्त्वाचे ट्विस्ट आणि शेवट आधीच सांगण्यास सुरुवात केली. त्यामुळे इतर प्रेक्षकांचा संताप अनावर झाला आणि चित्रपटगृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 03, 2026 | 12:46 PM
Spoiler दिला अन् थिएटरमध्ये झाला 'क्लायमॅक्स' (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Spoiler दिला अन् थिएटरमध्ये झाला 'क्लायमॅक्स' (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • स्पॉयलरमुळे थिएटरमध्ये गोंधळ.
  • प्रेक्षकांचा संताप अनावर.
  • घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
एखादा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित झाला की पहिल्याच दिवशी तो पाहण्यासाठी अनेकजण थिएटरमध्ये गर्दी करतात. मात्र एका छोट्याशा चुकीमुळे संपूर्ण वातावरण बिघडू शकते, याचा प्रत्यय नुकत्याच घडलेल्या एका धक्कादायक घटनेतून आला.

‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक चाहते तो पाहण्यासाठी चित्रपटगृहात पोहोचले होते. त्याच शोमध्ये काही मित्र एकत्र बसून चित्रपटाचा आनंद घेत होते. प्रत्येक सीनमध्ये काय घडणार, कोणता ट्विस्ट येणार आणि शेवट कसा असेल, याची त्यांना उत्सुकता होती.

शायनिंग पडली महागात

मात्र त्यांच्या शेजारी बसलेल्या एका तरुणाने त्यांच्या आनंदावर अक्षरशः पाणी फेरले. हा तरुण हा चित्रपट याआधी पाहून आला होता. यावेळी तो आपल्या मैत्रिणीसोबत पुन्हा तोच सिनेमा पाहत होता. पण चित्रपट सुरू झाल्यानंतर त्याने प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगाआधी पुढे काय होणार आहे, कोणत्या पात्रासोबत काय घडेल आणि कोणता मोठा ट्विस्ट येणार आहे, हे मोठ्याने सांगण्यास सुरुवात केली. ( VIDEO Viral)

प्रेक्षकांचा मूड खराब

सुरुवातीला आजूबाजूचे लोक त्याकडे दुर्लक्ष करत होते. मात्र वारंवार कथा उघड केल्यामुळे अनेक प्रेक्षकांचा चित्रपट पाहण्याचा मूडच खराब झाला. रहस्य आधीच समजल्यामुळे पडद्यावर सुरू असलेल्या दृश्यांचा थरार पूर्णपणे कमी झाला. काही वेळाने शेजारी बसलेल्या मित्रांच्या संयमाचाही अंत झाला. अखेर त्यांनी त्या तरुणाला शांत राहण्याची विनंती केली. मात्र त्यातून दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. काही क्षणांतच वातावरण तापले आणि वादाचे रूप भांडणात बदलले. एकमेकांना ढकलाढकली सुरू झाली आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. थिएटरमध्ये बसलेल्या इतर प्रेक्षकांमध्येही गोंधळ उडाला. काहीजण वाद सोडवण्याचा प्रयत्न करत होते, तर काहीजण भीतीपोटी बाहेर पडू लागले.

🚨MURDER AT SPIDER MAN: BRAND NEW DAY 2026 ON PREMIERE DAY! Group of friends went to the cinema excited to watch the newly released Spider-Man: Brand New Day. A guy sitting next to them had already seen the movie and was watching it again with his female friend. Throughout the… https://t.co/bV1hHC7hJR pic.twitter.com/TBcTSeJ0vI — Miraqle (@0xMiraqle) August 2, 2026

Deepika Padukone Pregnancy: दुसऱ्या प्रेग्नन्सीच्या चर्चांदरम्यान दीपिका पादुकोणची नवी पोस्ट; व्हिडिओतून सांगितलं दिवसभराचं रुटीन

चित्रपटगृहात आरडाओरडा सुरू

थोड्याच वेळात संपूर्ण चित्रपटगृहात आरडाओरडा सुरू झाला. चित्रपट थांबवावा लागला आणि कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी धाव घेतली. मनोरंजनासाठी आलेल्या अनेक कुटुंबांचा आणि प्रेक्षकांचा अनुभव या गोंधळामुळे खराब झाला.
मनोरंजनाचा खरा आनंद तेव्हाच मिळतो, जेव्हा प्रत्येकाला कथा स्वतःच्या डोळ्यांनी आणि कोणताही अंदाज नसताना अनुभवता येते. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही एखादा चित्रपट आधी पाहिला असेल, तर त्याचे रहस्य स्वतःपुरतेच ठेवा. त्यामुळे तुमच्यासोबतच इतरांचाही चित्रपट पाहण्याचा अनुभव संस्मरणीय ठरेल.

Shraddha Kapoor Followed Marathi Actress: श्रद्धाने ‘या’ मराठी अभिनेत्रीला इंस्टाग्रामवर केलं फॉलो; पोस्ट करत व्यक्त केल्या भावना

Web Title: Spider man brand new day spoiler sparks theatre fight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • funny viral video
  • hit movies
  • marathi newss

संबंधित बातम्या

Iran War : युद्ध की पैशांचा महापूर? अमेरिकेने खर्च केले तब्बल ३३.४ अब्ज डॉलर
1

Iran War : युद्ध की पैशांचा महापूर? अमेरिकेने खर्च केले तब्बल ३३.४ अब्ज डॉलर

Stock Market Holiday: सलग तीन दिवस शेअर बाजाराला सुट्टी, जाणून घ्या संपूर्ण वर्षाचे कॅलेंडर
2

Stock Market Holiday: सलग तीन दिवस शेअर बाजाराला सुट्टी, जाणून घ्या संपूर्ण वर्षाचे कॅलेंडर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.