Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पक्ष्याच्या घरट्यात साप घेऊ पाहत होता एंट्री तितक्यात पिल्लांची आई आली अन् मग जे झालं… हृदयद्रावक शेवट; Video Viral

स्वामी तिन्ही जागाही आईविना भिकारी! पक्ष्याने आपला जीव गमावला पण पिल्लांचा जीव वाचवला, शेवटपर्यंत सुरु राहिली साप पक्ष्याची लढत पण शेवटी जे झालं त्याने सर्वांचेच हृदय हेलावून गेले. आईच्या त्यागाचा हा व्हिडिओ एकदा पहाच.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 29, 2025 | 10:19 AM
पक्ष्याच्या घरट्यात साप घेऊ पाहत होता एंट्री तितक्यात पिल्लांची आई आली अन् मग जे झालं... हृदयद्रावक शेवट; Video Viral

पक्ष्याच्या घरट्यात साप घेऊ पाहत होता एंट्री तितक्यात पिल्लांची आई आली अन् मग जे झालं... हृदयद्रावक शेवट; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

निसर्गात अनेकदा अशा घटना घडून येत असतात ज्यापासून मानव वंचित आहे. याच घटनांचे व्हिडिओज अनेकदा सोशल मीडियावर शेअर केले जातात आणि ते व्हायरलही होतात. आताही असेच काहीसे घडून आले आहे ज्यातील दृश्य लोकांना तुमच्यासाठी वेदनादायी ठरतील. निसर्गाच्या क्रूर नियम कसा एकाच जीव घेतो आणि दुसऱ्याला त्यातून जिवंत राहण्यास मदत करते हे यातून पाहायला मिळेल. प्राणी असो पक्षी असो व मानव… प्रत्येक जीवांमध्ये भावना असतात. कुटुंबाला सांभाळण्याचे त्यांचे पालन पोषण करण्याची काम आई-वडील करत असतात. यात आपल्या मुलांवर कोणताही धोका ओढवला तर आई सर्वात आधी पुढे राहून मुलांची ढाल बनून उभी राहते हेच दृश्य व्हिडिओतही दिसून आले.

अशी वेळ कुणावरही येऊ नये! आईसमोरच ६ वर्षांच्या मुलाला ट्रकने चिरडले, दृश्य पाहून हृदय पिळवटून निघेल; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक साप एका झाडावर चढून येथे असलेल्या एका घरट्यात शिरण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. या घरट्यांमध्ये पक्षी आपली पिल्ले सुरक्षित ठेवतात. अशात या पिल्लांची शिकार करण्याच्या उद्देशानेच साप घरट्यात जाऊ पाहत होता मात्र तितक्यात मागून पिल्लांची आई येते आणि ती सापाला घरट्यात जाताना पाहते. यांनतर व्हिडिओत आपण पाहू शकतो की, पक्षी सापाला रोखण्यासाठी त्याला आपल्या चोचीने मारते मात्र साप काही मागे फिरत नाही ज्यानंतर ती आपल्या चोचीने सापाला पकडते आणि खाली फेकू लागते. पण दुसऱ्याच क्षणी सापही पक्ष्याच्या शरीराभोवती विळखा घालतो ज्यामुळे सापासह पक्षीही खाली जमिनीवर पडतो. शेवटी आपल्याला दोन्ही प्राणी खाली पडल्याचे दिसते आणि यावेळी सापाने पक्ष्याला जोरदार विळखा घातला असतो ज्यातून पक्ष्याचे बाहेर पडणे कठीण होते. आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी आई आपली जीवाची बाजी लावते आणि हे दृश्य मनाला भावुक करून जाते. तिची हार झाली असली तर आपल्या मुलांच्या वाचण्यात तिने यश मिळवले.

निसर्गात अनेकदा अशा घटना पाहायला मिळतात ज्या आपल्याला आश्चर्यचकित करतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका पक्ष्याने आपल्या पिलांना वाचवण्यासाठी एका धोकादायक सापाशी झुंज दिली. ही घटना एका झाडावर बनवलेल्या छिद्राची आहे जी पक्ष्याने घरटे म्हणून तयार केली होती. पण एका सापाने ते घरटे पाहिले आणि त्यात घुसून तळ बनवण्याचा प्रयत्न केला. साप हळूहळू त्या छिद्रात जाऊ लागला आणि कदाचित त्याला वाटले की येथे त्याला सहज शिकार मिळेल.

घटस्फोटाच्या दुःखाने असा कोसळला, हजारो लोकांचा जीव धोक्यात घालून चालू ट्रेनलाच लावली आग! ज्वलंत दृश्यांनी हादरून जाल; Video Viral

हा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे आणि लोक पक्ष्याच्या शौर्याला सलाम करत आहेत. हा व्हिडिओ @untamedoracircle नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आईचे प्रेम नेहमीच अतुलनीय असते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “परम त्याग” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “जगात आईपेक्षा मोठा योद्धा नाही”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: The snake was trying to enter the birds nest when the mother of the chicks arrived and then what happened a heartbreaking ending video viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2025 | 10:19 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

गज्जू दादाच्या समोर तर रोनाल्डो पण फेल आहे…! जबरदस्त किक मारत हत्तींनी खुल्या मैदानात खेळला फुटबॉल; खेळाचा मजेदार Video Viral
1

गज्जू दादाच्या समोर तर रोनाल्डो पण फेल आहे…! जबरदस्त किक मारत हत्तींनी खुल्या मैदानात खेळला फुटबॉल; खेळाचा मजेदार Video Viral

पानीपतचे तिसरे महायुद्ध…! शेतात दोन महिलांमध्ये जोरदार भांडण; एकमेकींना मिठी मारुन, मातीत लोळवलं अन्…, VIDEO VIRAL
2

पानीपतचे तिसरे महायुद्ध…! शेतात दोन महिलांमध्ये जोरदार भांडण; एकमेकींना मिठी मारुन, मातीत लोळवलं अन्…, VIDEO VIRAL

White House Gossip: ट्रम्पसोबत मेलोनीचा हॉट माइक VIDEO VIRAL; झेलेन्स्कीवरील टिप्पणी चर्चेत
3

White House Gossip: ट्रम्पसोबत मेलोनीचा हॉट माइक VIDEO VIRAL; झेलेन्स्कीवरील टिप्पणी चर्चेत

कोण आहे Utsav Dahiya? ज्याचा अपूर्व मुखिजावर फसवणुकीचा आरोप; व्हायरल व्हिडीओने उडाली खळबळ
4

कोण आहे Utsav Dahiya? ज्याचा अपूर्व मुखिजावर फसवणुकीचा आरोप; व्हायरल व्हिडीओने उडाली खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.